‘दोन घास उरवून दोन घासावरच जगतो आहे’...!

online kavi sammelan cartoon.jpeg
online kavi sammelan cartoon.jpeg
Updated on

नांदेड : कोरोनाच्या हाहाकाराने जगभरात मानवाला पळता भुई थोडी झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात विविध प्रश्नांबरोबरच स्थलांतरित मजूरांच्या चाललेल्या हाल अपेष्टांचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेकडो मैल पायपीट करणाऱ्या तसेच दीर्घकाळ चालत असलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांची, छोट्या व्यावसायिकांची परिस्थिती वर्णन करणारी कविता येथील प्रथितयश कवी गंगाधर ढवळे यांनी सादर केली, ‘चार घासांचे जगणे आहे, भोग माझे भोगतो आहे; दोन घास उरवून, दोन घासांवरच जगतो आहे’! 

सप्तरंगी साहित्य मंडळाकडून संमेलन
आनंदचेतना मासिकाच्या वर्धापन दिनानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळास शहरातील तरोडा शिवरोडवरील मायादेवी नगरात कविसंमेलनाकरिता पाचारण करण्यात आले होते. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी येथील ज्येष्ठ कवी एम. एस. गव्हाणे हे होते. तर उद्घाटक म्हणून ‘राजगृहाकडे चला’ या अभियानाचे मुख्य प्रवर्तक श्रीपती ढोले यांची उपस्थिती होती. यात निमंत्रित कवी म्हणून सप्तरंगी साहित्य मंडळाचे कवी अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, प्रशांत गवळे यांची उपस्थिती होती. 

दोन तासाच्या कविसंमेलनात आली रंगत
तर रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्रीपती ढोले, रिपब्लिकन सेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष मोहन लांडगे, कवी थोरात बंधू, आर. एन. शिंदे, भीमराव तेले यांचे काव्यवाचन संपन्न झाले. कवी गायकांनी दोन तास रंगलेल्या कविसंमेलनात चांगलीच रंगत आणली. दरम्यान, रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रदिप खंदारे यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या विद्यापीठ कँपसप्रमुखपदी नेमल्याची घोषणा श्रीपती ढोले यांनी केली. यावेळी उत्तम चावरे, अॅड. बाळासाहेब शेळके, प्रशिक ढोले, सुशील खंदारे यांची उपस्थिती होती.

लाॅकडाऊनचे नियम पाळून कविसंमेलन
लाॅकडाऊन आणि संचारबंदीचे नियम पाळून आनंदचेतना कविसंमेलन संपन्न झाले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरात वाढण चाललेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सबाबत आॅनलाईन जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याबाबत मंडळाच्या वतीने माहिती देण्यात आली. 

अनेकांनी सादर केल्या कविता
कवि संमेलनात सादर झालेल्या कवितांवर नागेश वाहुरवाघ, गंगाधर बिलोलीकर, शलिक जिल्हेकर, प्रशांत वंजारे, विशाल डाके, शिवराज पवळे, साऊल झोटे, कपिल मुळे, किशोर चहांदे, विनायक नगराळे, कपिल दगडे, किरण पतंगे, गजानन दामोदर, सज्जन बरडे, प्रशांत ढोले, राजेश डम्बारे, विरभद्र मिरेवाड आदींनी प्रतिक्रिया दिल्या. कविसंमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर प्रशिक ढोले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.