Sharadiya Navratrotsav 2022 : नवरात्रात घरोघरी घटस्थापना होवून देवीचे आगमन होते. अनेक भाविक भक्त या काळात आपल्या घरी सप्तशती पाठाचे पारायण करण्यास इच्छूक असतात. मात्र धावपळीच्या युगात प्रत्येकाला सप्तशती पारायणासाठी गुरुजी मिळतीलच असे नाही. त्यामुळे अनेक जण स्वतःच घरी सप्तशती पाठाचे पारायण करतात. मात्र हे पारायण करताना काही महत्वाचे नियम सांगितले आहेत. पारायण करताना नियम पाळणेही तितकेच महत्वाचे आहे. काय आहे हे नियम ते आपण जाणून घेवूया. (Follow the Rules while Saptashati granth parayan in shardiya navratri utsav ghatasthapana 2022)
शारदीय नवरात्रोत्सावत महाकाली, महालक्ष्मी, महासस्वती, दुर्गादेवी यासह कुलस्वामिनीचे मोठ्या भक्ती-भावाने घरोघरी पुजन केले जाते. या काळात नवरात्रात सप्तशतीपठणाचे विशेष महत्व आहे.
सप्तशती पाठाचे पारायण करताना पाळावयाचे नियम पुढील प्रमाणे आहे.
1) सप्तशतीचे पाठ करताना त्याचे संपुर्ण ज्ञान आपण आपल्या गुरुजनांकडून अवगत करुन घ्यावे. अज्ञानवश पाठ केल्यास त्याचे फळ प्राप्त होत नाही.
2) संपुर्णपणे शुचिर्भुत होवून एकाग्र चित्ताने सप्तशती पाठाचे पारायण करावे.
3) प्रत्येक स्तोत्राचा पाठ हा मानसिक न करता वाचिक असला पाहिजे.
4) मोठ- मोठ्याने ओरडून व उतावळेपणाने पाठ वाचू नये.
5) आपल्याला सप्तशती ग्रंथातील श्लोक मुखोद्गत (तोंडपाठ) नसतील तर पुस्तकात पाहून पारायण करावे मात्र श्लोकांचे चुकीचे उच्चारण करु नये.
6) सप्तशती पारायण करताना अध्याय समाप्ती झाल्यानंतर 'इति', 'वध', 'अध्याय' तथा 'समाप्त' अशा शद्बांचा उच्चार वर्ज करावा/ करु नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.