भारतीय स्त्रीदेवतेची अनेक रूपे आहेत जसे की श्रीआदिशक्ती दुगार्देवीची श्रीमहाकाली, श्रीमहालक्ष्मी आणि श्री महासरस्वती. त्याच बरोबर नवदुर्गा ही प्राचीन काळापासून प्रचलित आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री याही आहेत.
पण ही मालिका इथेच थांबली नाही, पुराणा पलीकडे जाऊन त्या त्या काळात देवीचे प्रतीक मानल्या गेलेल्या अनेक स्त्रियांचा यात समावेश झाला जसे की
१. विद्वान , वाक्चातुर्य असणारी अरुंधती
२.कर्दम ऋषींची कन्या अनुसूया
३. विदर्भ राजाची कन्या लोपामुद्रा
४. ब्रह्मवादिनी गार्गी
५. याज्ञवल्क्यांची पत्नी ब्रह्मवादिनी मैत्रेयी
६. सत्यवानाची पत्नी सावित्री
७. प्रभुरामचंद्रांची माता कौसल्या
८. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या
९. रावणाची पत्नी मंदोदरी
द्वापार आणि त्रेता युगात
१. विश्वामित्र-मेनका यांची कन्या शकुंतला
२. काशिराजाची कन्या अंबा
३. धृतराष्ट्राची पत्नी गांधारी .
४. राजा शूरसेनाची कन्या कुंती
५. अजुर्नाची पत्नी, वीर अभिमन्यूची माता सुभद्रा
६. द्रुपद राजाची कन्या द्रौपदी
७. भगवान कृष्णाचे पालन करणारी यशोदा
८. भगवान कृष्णाची माता देवकी
९. लक्ष्मीचे रूप असणारी श्रीकृष्णाची राधा
कली युगात
१. ताटीचे अभंग म्हणणारी संत ज्ञानेश्वरांची भगिनी मुक्ताबाई
२. संत कवयित्री कान्होपात्रा
३. भगवान श्रीकृष्णाची निस्सीम भक्त मीरा.
४. संत कवयित्री बहिणाबाई
५. उदयपूरच्या महाराणा संग्रामसिंहची पत्नी कर्मवती
६. उदयसिंह यांची दाई पन्नादाई
७. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची माता जिजाबाई
८. समाजकार्य करणारी अहल्याबाई होळकर
९. झाशीची राणी लक्ष्मीबाई
या सर्वच स्त्रिया आपला आदर्श आहेत, पण आता आधुनिकतेकडे वळत समाजकल्याणाचा वसा हाती घेऊन त्यानंतरच्या काळात
१. अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणार्या डॉ. आनंदीबाई जोशी
२. स्त्रीशिक्षण, स्त्रीमुक्ती , विधवा पुनर्विवाह यांच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले
३. स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या , सेवासदन संस्थेचे कार्य चालविणाऱ्या रमाबाई रानडे
४. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर
५. काव्य प्रतिभावंत बहिणाबाई चौधरी
६. पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी
७. तेजस्वी व परखड विचारवंत स्वातंत्र्य सेनानी अरुणा असफअली
८. अवकाश यात्री कल्पना चावला
९. बाबा आमटे यांच्या महान कार्यात सतत साथ देणारी त्यांची पत्नी साधनाताई
प्रत्येक काळात दुर्गादेवी अवतार घेत असते. सध्याही अनेक दुर्गांनी समाजसेवेचा वसा घेतलेला आपणास दिसून येतो. सध्या अनेक क्षेत्रात या आधुनिक दुर्गा महान कार्य करीत आहेत. अनाथांची माता बनलेली सिंधुताई सपकाळ, देशरक्षण करतांना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानाची पत्नी वीरांगना स्वाती महाडीक अशा आधुनिक नवदुर्गाना आपण नवरात्राच्या निमित्ताने अभिवादन करूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.