Navratri 2022 : नवरात्रीत उपवास केल्यावर होतोय ‘हा’ त्रास; मग हे पेय नक्की प्या

उपवासात सरबत, ज्युस यावर भर द्यावा असा डॉक्टरांचा सल्ला
navratri fast
navratri fastesakal
Updated on

पुणे : नवरात्रीत नऊ दिवस देवीची पूजा आणि कडक उपवास केला जातो. इतर कोणत्याही सणात असे उपवास नसल्याने नवरात्राला एक वेगळे महत्त्व आहे. उपवास म्हणजे शरीर, मन व आत्मा यांच्या आरोग्यासाठी एक समाधानकारक गोष्ट . नवरात्रीत काहीजण कडक तर काहीजण सर्वकाही खाऊन पिऊन उपवास करतात. त्यामुळे घरात उपवास असणाऱ्या लोकांची खास काळजी घेतली जाते.

हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थांची निवड करणे गरजेचे असते. काही ठिकाणी साबूदाणा खिचडी तर काही ठिकाणी केवळ फळे खाल्ली जातात. त्यामुळे उपवास संपत आल्यावर उपवास करणारा व्यक्ती आजारी पडतो.त्यामुळे सरबत, ज्युस यावर भर द्यावा असा सल्ला डॉक्टर देतात.

आपण दोन वेळा जेवतो आणि त्याचवेळी जास्त पाणी पितो. पण,आता नऊ दिवस जेवण नसल्याने पाणीही पिले जात नाही. त्यामुळे हमखास डिहायड्रेशनचा त्रास होतो. उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये नारळाचे पाणी घेणे योग्य ठरते. उपवास करत असताना पाण्याचे सेवन भरपूर करावे. त्रास होऊ नये म्हणून कोणते सरबत घ्यावेत याबद्दल जाणून घेऊयात

ऑरेंज ज्यूस

संत्र्याच्या रसापासून तुम्ही ज्यूस बनवू शकता. संत्र्याचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असून तो पचनास मदत करतो. लेमोनेड बनवण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आले,संत्र्याचा गर, काळे मीठ, साखर, बर्फ आणि सोडा एकत्र करून मिक्सरमध्ये ब्लेंड करा.

गोल्डन लाटे

तुम्ही दूध गरम करून त्यात हळद, खजूर, काळी मिरी पावडर आणि व्हॅनिला घाला आणि गरम गरम गोल्डन लाटेचा आस्वाद घ्या. याने दिवसभर पोट भरलेले राहिल.

कलिंगड आणि तुळस

कलिंगडच्या रसात तुळशीची ताजी पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ घाला. तुम्ही त्यात टरबूजचे तुकडे टाकून वर बर्फही टाकू शकता. हा रस तुम्हाला तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवेल, तसेच डिहायड्रेशनचा त्रासही होणार नाही.

चिया सिड्स आणि नारळाचे पानी

एक ग्लास ताजे नारळ पाणी घेऊन त्यामध्ये चिया सिड्स घाला. चिया सिड्समध्ये फायबर, प्रथिने अधिक प्रमाणात असतात. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता.

आले आणि अननस

उपवासात स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी एक ग्लास अननसाचा रस घ्या. त्यात आल्याचा रस मिक्स करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.