नोकरी असो वा व्यवसाय आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. मग ते काम इनडोअर असो किंवा आउटडोअर. अगदी पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या व्यवसायातही महिला समान भूमिका बजावत आहेत. त्यातलचं आणखी एक उदाहरण म्हणजे मुळच्या केरळच्या असलेल्या राधानगरीतील शिला पुजारी या चालवतात. आज जाणून घेऊयात त्यांची कहाणी.
केरळमध्ये मी टेलरिंग काम करायचे. ते काम मी शिकवायचे ही. पण माझ्या वडिलांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबरदारी माझ्यावर आली. लहान असताना केरळमधून आले. कोल्हापूर पहायला म्हणून आले होते. त्यामुळे मी राधानगरीत येऊन वडिलांचे काम करायचे ठरवले. ठरवलं तर होत पण अडचण होती भाषेची. मी कधीच मल्याळम सोडून इतर भाषा शिकले नव्हते कधी बोलले ही नव्हते. पण जबाबदारी आपल्याला सगळं शिकवते त्याप्रमाणे मी कोल्हापुरात येऊन इथली भाषा शिकले. आता मला मराठी, हिंदी, मल्याळम आणि तमिळ या भाषा येतात.
वडीलांना हातभार म्हणून मी त्यांना मदत करत होते. पण, तू हे काम करू नको असे ते म्हणायचे. तू हे पुरूषांचे काम करू नको. कुठेतरी लागेल या भीतीने ते असे म्हणायचे. तरीही गाडी दुरूस्तीला आल्यावर ते काय करतात. कसे काम करतात, हे मी चोरून पहायचे. त्यामुळे मलाही हे काम जमू लागले. वडीलांच्या निधनानंतर मी हे कामच करू लागले.
आता या कामात मला 25 वर्ष झाली. मला या व्यवसायाने भरपूर काही दिल. माझ्या कुटुंबाचं पोट भरलं. इथे माझे मिस्टर आणि एक मुलगा आहे. तर केरळमध्ये माझी आई, बहीण आणि माझा दुसरा मुलगा आहे. माझा मुलगा केरळमध्ये नोकरीला आहे. तर छोटा मुलगा पंक्चरचे दुकान चालवतो. वडिलांचा आशीर्वादाच म्हणावा लागेल की मी कधीही न केलेल्या कामात आज पारंगत झालीय. राधानगरीत मला सगळे शीला भाभी म्हणून ओळखतात.
एक बाई गॅरेज चालवते. ट्रक, ट्रॅक्टरच पंक्चर काढते. मोठ्या वाहनांना जॅक लावते. याच लोकांना कौतुक तर वाटतच पण अप्रूपही वाटत. मला अनेकजण विचारतात की, तुम्ही एवढ्या जास्त वजनाचे टायर कशा उचलता. कसे जमते तुम्हाला. त्यावर मी अस सांगते की, आम्ही केरलमध्ये हत्ती खूप जवळून पाहिले आहेत. जगात सर्वात बलाढ्य प्राणी हत्ती आहे. त्याला ओढून नेणं त्याची देखरेख करणं हे सगळं एक सामान्य तुमच्या आमच्या सारखा माहूत करतो. ते त्याला कस जमत. जर हत्ती सांभाळणं त्याला फिरवण एक माणूस करतो तर मग ट्रकच चाक ही काही फार मोठी गोष्ट नाही.
हत्ती सांभाळणे हे त्या माहुताचा प्रामाणिक प्रयत्न असतो. तसेच इतके बोजड चाक उचलण्यासाठीही माझा प्रमाणिक प्रयत्न असतो. कष्टाला प्रामाणिकपणाची जोड दिली की सगळं जमतं.राधानगरी ग्रामीण भाग पडतो त्यामुळे इथे म्हणावं अस सपोर्ट मिळत नाही. लोकं चांगले बोलतात पण अजूनही माझी आर्थिक बाजू भक्कम व्हावी यासाठी कोणी मदत केली नाही.
इथून दुसरीकडे शिफ्ट होणं किंवा दुसरं काही सुरू करावे असा विचार कधीही आला नाही. कारण, ही माझी कर्मभूमी आहे. राधानगरीवरून मालवाहू ट्रक जातात त्यामुळं रात्री अपरात्रीही कधी ट्रक कामासाठी आला तरी मी काम करते. त्यांना मदत करते. यामुळेच येणारे जाणारे लोक ओळखीचे आहेत.
दिल्लीमधील ट्रक चालक तिकडे जाऊन इतर चालकांना सांगतात की, राधानगरी रोडवर कधीही काही अडचण आली. गाडी बंद पडली तर हक्काने शीला भाभीकडे जा. त्या कधीही तुमच्या मदतीला तयार असतात. गरजू लोकांची मदत करतो आहेत यातच माझं समाधान आहे.
आज इतर महिलाही या क्षेत्रात आल्या आहेत. बऱ्याच महिला प्रसिद्ध झाल्या आहेत. पण 25 वर्ष आधी गॅरेज चालवणारी, मोठ्या वाहनांना जॅक लावणारी मी एकटीच होते. त्याचा मला अभिमान आहे. शेवटपर्यंत मी हे काम करत राहीन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.