Shardiya Navratri 2022: हिंदू कॅलेंडरनुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२, सोमवारपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीत लसूण-कांदा खाणे निषिद्ध मानले जाते, याचे कारण काय? जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत वाचा.
शारदीय नवरात्री २६ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. या नऊ दिवसांत मंदिरे, घरे आणि भव्य मंडपात घटाची स्थापना करून देवीची पूजा केली जाईल. नवरात्रीमध्ये लोक दुर्गा देवीची पूजा करतात आणि उपवास ठेवतात.उपवासात सात्विक आहार घेतला जातो ज्यामध्ये धान्य, फळे आणि भाज्या यांचा समावेश होतो. जे व्रत करत नाहीत, तेही केवळ सात्विक भोजन घेतात. नऊ दिवस जेवणात लसूण-कांदा खाणे वर्ज्य मानले जाते. पण नवरात्रीत लसूण-कांदा खाण्यास मनाई का आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर शेवटपर्यंत वाचा.
कांदा-लसूण खाण्यास मनाई
हिंदू धर्मात अनेक मान्यता असल्या तरी नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूण खाण्याचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येकजण या नियमाचे पालन करतो. हिंदू पुराणानुसार, पूजेत किंवा उपवासाच्या वेळी लसूण आणि कांदा वापरू नये किंवा त्यापासून बनवलेले अन्न सेवन करू नये.
हिंदू पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन होत असताना त्यातून ९ रत्ने बाहेर आली आणि शेवटी अमृत बाहेर पडले. यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत अर्पण केले. तेव्हा राहू-केतू या दोन राक्षसांनी देवांचे रूप धारण केले आणि ते अमृत प्याले.
यानंतर भगवान विष्णूंनी त्यादोघांना शिक्षा म्हणून सुदर्शन चक्राने त्यांचे दोन भाग केलेत. असे मानले जाते की जेव्हा त्याचे डोके धडापासून वेगळे केले गेले तेव्हा त्याच्या रक्ताचे काही थेंब जमिनीवर पडले आणि त्यातून लसूण कांद्याची उत्पत्ती झाली. म्हणूनच कांदे आणि लसूण उग्र वास देतात.राहू-केतूच्या शरीरात अमृताचे काही थेंब पोहोचले होते, त्यामुळे त्यांच्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते,असेही म्हटले जाते.कांदा आणि लसणाच्या अतिसेवनामुळे माणसाचे मन धर्मापासून विचलित होऊन इतर कामे करू लागते,असेही म्हटले जाते.
पुराणात कांदा आणि लसूण राजसिक आणि तामसिक मानले गेले आहेत.असे म्हणतात की तामसिक आणि राजसिक गुणांच्या वाढीमुळे व्यक्तीचे अज्ञान वाढते, त्यामुळेच त्याचे मन धर्मात गुंतून राहावे यासाठी सात्विक आहार घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो.मांस-मासे,कांदा,लसूण इत्यादी तामसिक अन्नाला राक्षसी प्रकृतीचे अन्न म्हणतात.त्यामुळे घरात अशांती,रोग आणि चिंता वाढतात,म्हणून कांदा-लसूण खाणे हिंदू धर्मात निषिद्ध मानले जाते.
आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक कारणे
आयुर्वेदानुसार, अन्नपदार्थांचे स्वभाव आणि खाल्ल्यानंतर शरीरातील प्रतिक्रिया या आधारे तीन प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकते. जसे:
- राजसिक आहार
- तामसिक आहार
- सात्त्विक आहार
उपवासाच्या वेळी लोक सात्विक अन्न खातात, परंतु त्यामागे धार्मिक श्रद्धेव्यतिरिक्त एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
शारदीय नवरात्री ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येते ज्या दरम्यान ऋतू शरद ऋतूपासून हिवाळी हंगामात बदलतो. बदलत्या हवामानामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. अशा स्थितीत या ऋतूत सात्विक अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बरोबर राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून बाहेर पडतात.
शास्त्रानुसार कांदे आणि लसूण हे तामसिक स्वभावाचे मानले जातात आणि ते शरीरातील मानसिक आणि भावनिक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे मन भरकटते. त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात याला परवानगी नाही.कांद्यासोबत लसूण हे रजोगिनी म्हणून ओळखले जाते, याचा अर्थ असा की लसूण हा एक असा पदार्थ मानला जातो ज्यामुळे तुमच्या इच्छा आणि प्राधान्यांमध्ये फरक करणे कठीण होते.
नवरात्री घटस्थापना मुहूर्त (नवरात्री २०२२ घटस्थापना मुहूर्त)
सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी अश्विन घटस्थापना
घटस्थापना मुहूर्त - सकाळी ०६.२८ पर्यंत
कालावधी - ०१ तास ३३ मिनिटे
घटस्थापना अभिजीत मुहूर्त - दुपारी १२.०६ ते १२.५४ पर्यंत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.