Navratri 2023 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गा मातेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. माता चंद्रघंटा सिंहावर स्वार होते. दहा भुजा चंद्रघंटा रूपात देवी एका हातात कमळ आणि कमंडल धारण करते तर दुसरीकडे शत्रूंचा नाश करण्यासाठी त्रिशूल, गदा आणि खडग अशी शस्त्रे धारण करते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेची चंद्रघंटा अवतारात पूजा केली जाते. माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धा आहे. चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते, अशी भक्तांची मान्यता आहे.
देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजा कशी करावी, पूजेची पद्धत, मंत्र आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया. (Navratri 2023)
पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट अन् चांगल्या वृत्तींचे युद्ध होत आले आहे. हे आपल्यासाठी काही नवे नाही. वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात अन् त्यांचा विनाश करतात. अशाच प्रकारे माता चंद्रघटेचा जन्म झाला.
पौराणिक कथेनुसार, महिषासुर राक्षसाने आपल्या शक्तीचा अहंकार बाळगून देलोकावर हल्ला केला. त्यानंतर महिषासुर आणि देवतांमध्ये घनघोर युद्ध झाले. जेव्हा देव हरायला लागले तेव्हा ते मदतीसाठी ब्रह्मा विष्णू अन महेशांकडे धावत आले.
देवांचे हाल ऐकून तिन्ही देव क्रोधित झाले. त्यावेळी माता चंद्रघटाच या राक्षसाचा वध करतील. असे म्हणून या तिन्ही देवांनी चंद्रघटेची निर्मिती केली. भगवान शंकरांनी मातेला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र, देवराज इंद्राने घंटा, सूर्यदेवांनी धारदार तलवार आणि वाघावर स्वार केले. तसेच इतर देवी-देवतांनीही मातेला शस्त्रे दिली.
मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशाप्रकारे, देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या.
पुराणानुसार, जेव्हा भगवान शिव पार्वतीशी लग्न करण्यासाठी राजा हिमालयाच्या राजवाड्यात आले तेव्हा ते केसात अनेक साप, पिशाच्च, अघोरी साधू यांच्यासह लग्नाला आले. ती अनोखी वरात पाहून माता पार्वती बेशुद्ध पडली. त्यानंतर पार्वतीने चंद्रघंटा देवीचे रूप धारण केले आणि शिव पार्वतींचा विवाह झाला.
माता चंद्रघंटा डोक्यावर मुकुट धारण करते. त्याला अर्धचंद्र आणि दिव्य घंटा असते. म्हणून चंद्रघंटा देवीला या रूपात संबोधले जाते. मातेच्या या रूपाची पूजा करण्यासाठी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर गंगाजल किंवा गोमूत्राने मातेची जागा शुद्ध करावी.
यानंतर, कलश पाण्याने भरा आणि त्यावर नारळ ठेवा. वैदिक आणि सप्तशती मंत्रांचा जप केल्यानंतर पूजा करण्याचा संकल्प घ्यावा. त्यानंतर वस्त्र-दागिने , हळदी-कुंकू, चंदन, कापूस, सिंदूर, दुर्वा, बेलपत्राची पाने, फळे-फुले, धूप-दीप, नैवेद्य, पान, मातेला अर्पण करून आरती करावी.
या रंगांची फुले अर्पण करा
देवीच्या पूजेसाठी लाल आणि पिवळ्या फुलांचा वापर करावा. पूजेमध्ये अक्षत, चंदन आणि भोगासाठी झाडे अर्पण करावीत. असे मानले जाते की मंत्रोच्चार, तुपाचा दिवा लावणे, आरती, शंख आणि घंटानादामुळे वाजवणे यामुळे माता प्रसन्न होते.
मातेचा आवडता प्रसाद
मातेची पूजा करताना तिला दूध किंवा दुधापासून बनवलेली मिठाई किंवा खीर अर्पण केली जाते. ब्राह्मणांना अन्नदान करण्यासाठी नैवेद्यही दिला जातो. ब्राह्मणाला भोजनासोबत दक्षिणा,कपडे दान केल्याने माता समाधानी होते.
तसेच, चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्या भक्ताला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते.
माता चंद्रघंटेचा मंत्र
पिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता
प्रसादं तनुते मह्मम् चंद्रघण्टेति विश्रुता
या ऊं देवी चंद्रघण्टायै नम:
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.