Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला नुकतीच सुरूवात झाली आहे. आज नवरात्रौत्सवाचा दुसरा दिवस आहे. नवरात्रौत्सवाच्या काळात अनेक जण उपवास करतात. काही जण तर निर्जळी उपवास देखील करतात.
देवीच्या श्रद्धेपोटी अनेक जण हे उपवास करतात. मात्र, या काळात उपवास करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असते, हे देखील तितकचं खरं आहे. उपवास केल्याने शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते.
या काळात उपवास करताना भूक लागणे ही सामान्य बाब आहे. परंतु, या दरम्यान उपवास करताना या भूकेवर नियंत्रण मिळवणे महत्वाचे आहे. भूकेवरील हे नियंत्रण मिळवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत. कोणते आहेत हे उपाय? चला तर मग जाणून घेऊयात.
नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये उपवास करताना तुम्हाला भूक कंट्रोल होत नसेल, तर जास्तीत जास्त पाणी प्या. पाणी पिऊन तुम्ही तुमची भूक सहज आणि प्रभावीपणे कमी करू शकालं. त्यामुळे, परिणामी भूकेवर कंट्रोल करायला मदत होईल.
पाणी पिल्यामुळे तुमचे पोट भरलेले राहते आणि भूकही लागत नाही. पाणी पिल्यामुळे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. तसेच, पाण्यामुळे तुम्हाला हलके आणि उत्साही वाटेल.
नवरात्रीमध्ये उपवास करताना भूक नियंत्रित ठेवण्याचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे भरपूर फळे खाणे होयं. भूक दूर करण्यासाठी फायबरयुक्त फळांचा आहारात समावेश करणे, फायदेशीर ठरते.
फळांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. शिवाय, फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले राहते आणि भूक नियंत्रित राहते. त्यामुळे, उपवास करताना फायबरयुक्त फळांचे सेवन अवश्य करावे.
नवरात्रीमध्ये उपवास करताना चांगली झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. या दरम्यान रात्रीचे जागरण करू नका. जर तुमचे जागरण झाले तर तुम्हाला जास्तीची भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे, जागरण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.
जर या काळात तुम्ही पुरेशी झोप घेतली तर भूकेपासून दूर राहण्यास मदत होईल. तुम्ही दुपारच्या वेळी ही झोप घेऊ शकता. झोप घेतल्याने भूक नियंत्रणात राहते. झोपेमुळे शरीराला आराम मिळतो आणि भूकेवर नियंत्रण ही मिळवता येते.
नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये उपवास करताना जास्त गोड आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. या काळात जर तुम्ही साखर असलेले पदार्थ, तेलकट पदार्थांचे सेवन केले तर तुम्हाला जास्त भूक लागण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे, या ९ दिवसांमध्ये तेलकट पदार्थ आणि साखरेपासून दूर रहा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.