Navratri Festival : कोलकत्याच्या गंगा नदीतलं पाणी अन् मातीनं कोल्हापुरात साजरी होते 'नवरात्र'

बंगाली बांधवांनी पर्यावरणपूरकतेची परंपराही कायम ठेवली आहे.
Navratri Festival 2023 Western Maharashtra
Navratri Festival 2023 Western Maharashtraesakal
Updated on
Summary

२००० मध्ये बंगाली कारागिरांनी एकत्र येऊन दुर्गा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

Navratri Festival 2023 : पश्‍चिम बंगालमधील (West Bengal) ही माणसं. मात्र, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पंचवीस वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने ती आली आणि इथलीच होऊन गेली. तसं पाहिलं तर बंगालमधील भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना येथे यावे लागले असले, तरी त्यांच्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.

Navratri Festival 2023 Western Maharashtra
वाघनखांवरुन राजकारण तापलं! 'आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील'; मंडलिक, मुश्रीफांचा निशाणा

येथील संस्कृती त्यांनी आत्मसात केलीच. पण, त्याचबरोबर बंगालमधील संस्कृतीही ही माणसं इथं जपत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा म्हणजे नवरात्रोत्सवातील (Navratri Festival) दुर्गामातेचा उत्सव. यानिमित्ताने या बंगाली बांधवांनी पर्यावरणपूरकतेची परंपराही कायम ठेवली आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे, तर इचलकरंजी, मिरज, सांगली आदी परिसरांत दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने ही मंडळी एकवटतात. या उत्सवासाठीच्या पाटपूजनाचा कार्यक्रम नुकताच झाला.

Navratri Festival 2023 Western Maharashtra
Jayant Patil : भाजप खासदाराच्या आरोपानंतर NCP प्रदेशाध्यक्षांनी केली आमदार सुमन पाटलांची पाठराखण; काय आहे कारण?

गंगा नदीतील पाणी आणि माती..

जिल्ह्यात बंगाली मजुरांची संख्या सुमारे पस्तीस हजारांवर आहे. त्यातील बहुतांश कुटुंबे येथे स्थायिक झाली आहेत. कोरोना काळात काही मजूर पुन्हा बंगालला गेले. मात्र, त्यातील बहुतांश मंडळी पुन्हा येथे आली असून, आता स्थिरस्थावर झाली आहेत. त्यामुळे यंदाचा दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उत्सवापूर्वी परंपरेनुसार, अगोदर कोलकत्त्याहून गंगा नदीतील पाणी आणि माती घेऊन मूर्तिकार येथे येतात. त्यानुसार ही मंडळी आता दाखल झाली असून, मूर्ती साकारू लागल्या आहेत. नवरात्रोत्सवात षष्ठीपासून विजया दशमी, दसऱ्यापर्यंत दुर्गा उत्सव साजरा होणार आहे.

पाच दिवसांचा उत्सव...

लॉकडाउनच्या काळात बंगाली कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, विविध स्थानिक संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने सर्वांनी एकमेकांना आधार दिला. त्यामुळे परस्परातील नाते आणखी दृढ झाले आहे. बंगालमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि त्यासाठी दुर्गामातेच्या भव्य मूर्ती साकारल्या जातात. अशाच पद्धतीचा उत्सव येथे व्हावा, या संकल्पनेतून २००० मध्ये बंगाली कारागिरांनी एकत्र येऊन दुर्गा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला स्थानिक नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला.

Navratri Festival 2023 Western Maharashtra
Kolhapur : ..तर मानवी मेंदू आणि हृदय भविष्यात कारखान्यात तयार होण्याची शक्यता; डॉ. भोंडवेंचं मोठं विधान

सुरवातीला हा उत्सव छोटेखानी व्हायचा. मात्र, आता एखादा सांस्कृतिक हॉल घेऊन तेथे हा उत्सव साजरा केला जातो. पंचमीला उत्सव सुरू होतो. महाषष्ठी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी आणि विजया दशमी अशा विविध पूजा होतात. कोलकत्त्याहून मूर्तिकार व पुरोहित उत्सवासाठी येतात. दुर्गामातेची मूर्ती आता साकारली जात असून, आठ ते दहा फूट उंच मूर्ती असते. त्याबरोबरच शेजारी गणपती, कार्तिकेय, लक्ष्मी, सरस्वती या मूर्तींचीही प्रतिष्ठापना होणार आहे. महाअष्टमीच्या पूजेला उत्सवात मोठा मान असून, त्यानंतर होणाऱ्या महाप्रसादाच्या निमित्ताने सारा बंगाली समाज एकवटतो आणि आनंदोत्सव साजरा करतो.

सर्व समाज घटकांचा सन्मान...

दुर्गा उत्सवातील सर्व धार्मिक विधी ठरलेल्या वेळेनुसार न चुकता केले जातात. धार्मिक विधीमध्ये सर्व समाजघटकांचा सन्मान पूर्वापार चालत आला आहे. बदलत्या काळातही ही परंपरा आम्ही जपली आहे. उत्सवकाळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते, असे बंगाली सुवर्ण कारागीर संस्थेचे अध्यक्ष बिश्वजित प्रामाणिक सांगतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()