Navratri Travel: येथे आहे महिषासुराची भव्य प्रतिमा; लाखो पर्यटक येतात पहायला!

पौराणिक कथेनुसार, माता दुर्गा देवतांचे रक्षण करण्यासाठी महिषासुराशी 9 दिवस लढली.
Navratri Travel
Navratri TravelEsakal
Updated on

नवरात्री आपल्या देशात मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. पौराणिक कथेनुसार, माता दुर्गा देवतांचे रक्षण करण्यासाठी महिषासुराशी 9 दिवस लढली. त्याचा वध केल्यानंतर दहाव्या दिवशी दुर्गामातेचा विजयी झाला. असुरांवर विजय मिळवण्यासाठी हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. नवरात्रीमध्ये मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते तेव्हा त्यासोबत महिषासुराच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना केली जाते. पण तुम्हाला भारतातील असे कोणतेही मंदिर पाहायला मिळणार नाही जिथे तुम्हाला असुरांची मूर्ती पाहायला मिळेल. 

Navratri Travel
Navratri 2022: नवरात्रामध्ये अष्टमीला का असते इतके महत्त्व?

म्हैसूरबद्दल असे म्हणने चुकीचे ठरेल. कारण तिथे चामुंडी हिल्सवर तुम्हाला महिषासुराची मूर्ती आहे. जी इथले मुख्य आकर्षण आहे. दरवर्षी हजारो आणि लाखो पर्यटक येथे भेट देतात. पाहण्यासाठी येतात आणि तिथे त्यांचा वीकेंडही आनंदाने साजरा करतात.

Navratri Travel
Navratri 2022: चंद्रपूर श्री महाकाली देवीचा इतिहास

चामुंडी हिल्सवर असलेली महिषासुराची मूर्ती खूपच आकर्षक आहे. या मुर्तीच्या एका हातात नाग असून दुसऱ्या हातात तलवार आहे. याशिवाय येथे नंदीचा पुतळा देखील आहे. चामुंडी टेकड्यांवर चामुंडेश्वरी मातेचे मंदिर आहे. जिथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात. असे मानले जाते की मातेच्या मंदिरात केलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. दुर्गापूजेच्या वेळी भक्तांची गर्दी आणखी वाढते. मातेचे दुसरे रूप चामुंडेश्वरी आहे. 

Navratri Travel
Navratri 2022: अष्टमी पूजा करताना शास्र शुध्द पद्धतीने होमहवन कसे करावे?

महिषासुराची मूर्ती पाहण्यायाठी सकाळी ७:०० ते रात्री ९:०० येथे गर्दी होते. म्हैसूर शहराला भेट देणारे बरेच पर्यटक या टेकडीला भेट देतात. या ठिकाणी तूम्ही प्लेनने येणार असाल तर म्हैसूर विमानतळ, आणि रेल्वेने येणार असाल तर म्हैसूर जंक्शनवरून येऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.