Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला 26 सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून सर्वत्र देवीच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे. नवरात्रोत्सवात देशभरात देवीचे पुजन आपल्या कुळातील प्रथेप्रमाणे केले जाते. देवीचे पुजन करताना नवरात्रीचे चार अंगांनी पुजन केले जाते. काय आहेत नवरात्रीची चार अंगे ते जाणून घेण्यासाठी हा लेख पुर्ण वाचा. (Shardiya Navratri 2022 Perform Navratri Durga devi puja with 4 parts spiritual importance)
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करुन घरोघरी देवीची भाविक भक्तांकडून मनोभावे पुजन केले जाते. देवीची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर रहावी यासाठी मोठ्या भक्ती-भावाने भाविक देवीची आराधना, पुजाअर्चा करतात. नवरात्रोत्सवात प्रमुख 4 अंगांनी देवीचे पुजन केले जाते. नवरात्रीची 4 प्रमुख अंगे आपण जाणून घेवूया.
नवरात्रीची प्रमुख 4 अंगे
1) देवतास्थापन
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते. यावेळी देव्हाऱ्यातील देवतांचे विधीव्रत पुजन करुन नवरात्रोत्सवासाठी स्थापना केली जाते. काही जणांकडे वेदिका (शेत) स्थापना करतात, त्यासाठी वेदिकेत शेतातील काळी माती आणून त्यात सप्तधान्ये हळदीच्या पाण्यात रंगवून पेरावीत.
2) मालाबंधन
नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी झेंडूच्या फुलांची माळ बांधली जाते. मालाबंधनावरुन नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला माळ असेही म्हटले जाते, जसे कि प्रतिपदा असेल तर नवरात्रीची पहिली माळ, अष्टमी असल्यास नवरात्रीची आठवी माळ याप्रमाणे.
नवरात्रात मालाबंधन करताना (माळ बांधताना) त्यावेळेस उपलब्ध असलेल्या सुवासिक फुलांची माळ बांधावी.
3) नंदादीप(अखंड दीप)
घटस्थापनेबरोबर अखंड नंदादीप किंवा दिवा पेटविला जातो. जो आपल्या कुळाचारानुसार नवरात्रीच्या त्या तिथीपर्यंत तेवत ठेवला जातो. देवीच्या सदैव वास आपल्या घरात असावा, घरातील आरीष्ट्य निरसन व्हावे यासाठी नवरात्रीच्या काळात अखंड दीपप्रज्वलन केले जाते. नंदादीप लावण्यासाठी धातूची जाड समई वापरावी. तेलाची जोडवात एक वीत लांब असावी व ती कुंकवाने रंगवावी. नंदादीप अखंड तेवत असावा. नंदादीप शांत होण्याची भीती असल्यास दोन समया लावाव्यात. नवरात्राचा नंदादीप तेल संपल्यामुळे अगर काजळी झटकताना शांत झाल्यास कुलदेवतेच्या नाम मंत्राचा १०८/१००८ जप करावा किंवा विष्णुसहस्रनाम वाचावे.
4) कुमारिकापूजन
कुमारिकापूजन म्हणजे नवरात्र व्रताचा प्राण आहे. देवीच्या रुपात कुमारिका आपल्या घरी येवून आपल्याला आशिर्वाद देते असे मानले जाते. त्यामुळे देवीच्या रुपात कुमारिकापुजन केले जाते. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत रोज किंवा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुवून तिला मिष्टान्न भोजन द्यावे.
विवेचन - पं. नरेंद्र धारणे, नाशिक (धर्म अभ्यासक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.