Vijaya Dashami 2023 : विजयादशमी हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवला. त्यामुळे विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला साजरा केला जातो.
या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि इंद्रजित यांच्या पुतळ्यांचेही दहन केले जाते. यावर्षी 24 ऑक्टोबर 2023 रोजी विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो आणि नवीन सुरुवात केली जाऊ शकते. दसऱ्याच्या दिवशी गरजू व्यक्तीला दान केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते.
दसऱ्याच्या दिवशी कोणती कामे केली पाहिजेत ते जाणून घेऊया.
मुहूर्तावरच हे काम करा
चौकातील, मंडळातील मुले रावणाचा पुतळा बनवतात आणि जाळतात. याशिवाय अनेक सोसायट्या किंवा वसाहतींमध्येही असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अशा स्थितीत रावण दहनाचा शुभ मुहूर्त २४ ऑक्टोबरला संध्याकाळी ५:४३ नंतर असेल. शुभ मुहूर्तानुसार तुम्ही रावण दहन करू शकता. मुहूर्तानंतर रावण दहन करू नका.
खंड्या पक्ष्याचे दर्शन
दसऱ्याच्या दिवशी खंड्या पक्ष्याचे दर्शन होणे अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी कुठेतरी खंड्या पक्षी दिसला तर तुमची कामे नक्कीच पूर्ण होतील, अशी श्रद्धा आहे. तसेच, दसऱ्याच्या आधी आपल्या कडे खंडे नवमीही साजरी केली जाते. त्यामुळे खंड्या पक्षाचे म्हणजे किंगफिशर पक्षाचे दर्शन नक्की घ्या.
दान करा
आर्थिक समस्या प्रत्येकाला भेडसावत असते.अशातून मुक्ती मिळवण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी मंदिरात स्वच्छतेशी संबंधित वस्तू दान करणे शुभ मानले जाते. तसेच जीवनाशी निगडीत रोग व दु:खांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्यक्तीच्या डोक्यावरून नारळ उतरवून रावण दहनाच्या अग्नीत टाकावा.
गोकर्णाच्या वेलीची पूजा
विजयादशमीच्या दिवशी विधीनुसार पूजा केल्यास शत्रूंवर विजय प्राप्त होतो. दसऱ्याच्या दिवशी गोकर्णाच्या वेलीची पूजा केल्याने तुम्हाला शत्रूंपासून मुक्ती मिळेल. आपल्या प्रगतीवर जळणारे अनेक लोक असतात.
जे आपल्या तोंडावर गोड बोलतात अन् माघारी कुरघोड्या करतात. अशा लोकांपाससून आपण दूर राहीलो तरी ते आपल्या जवळपास येतच राहतात. अशा लोकांपासून मुक्ती मिळवायची असेल तर दसऱ्यादिवशी या वेलीची पूजा करा.
शमीच्या झाडाची पूजा
अनेक लोकांच्या कुंडलीत शनीचा त्रास असतो. त्यामुळे अनेक अडथळे येत असतात. तुमच्या राशीतही शनीदोष असेल तर तुम्ही विजयादशमीचा दिवशी शमीच्या झाडाची पूजा अवश्य करा. असे केल्याने तुमचा त्रास दूर होऊ शकतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.