Dasara Muhurat 2022 : अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सवातील दशमीला दसरा हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा सण हा शौर्य आणि विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी शस्त्र, वाद्य पुजन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी प्रभु श्री रामाने लंकाधिपती रावणाचा वध केला होता. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या उत्साहात साजरा केल्याजाणाऱ्या या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. यंदा दसरा सणाच्या तारखेबाबत संभ्रम असल्याने सण कधी साजरा करावा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला तर जाणून घेवूया नेमका दसरा कधी साजरा करावा.
(Vijayadashami Dasara Muhurat Information 2022 Shardiya Navratri)
दसरा 4 कि 5 ऑक्टोबरला...?
कॅलेंडरमध्ये दसऱ्याची तारीख 5 ऑक्टोबर आहे मात्र दशमी तिथीला 4 ऑक्टोबर मंगळवार रोजी प्रारंभ होत असल्याने 4 तारखेला दसरा साजरा करण्याबाबत बोलले जात आहे. मात्र पंचांगानुसार सण 4 कि 5 ऑक्टोबरला साजरा करणे सर्वात योग्य आणि सर्वोत्तम असेल ते आपण पाहू. (Vijayadashami Dasara Muhurat Information 2022 Shardiya Navratri)
नेमका सण कधी साजरा करावा...?
दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी दशमी तिथी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजुन 20 मिनीटांनंतर सुरू होत आहे. त्याचबरोबर दशमी तिथी 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत राहणार आहे. मात्र पंचांगाप्रमाणे आपण सुर्योदयाला असणारी तिथी मानतो त्यामुळे दसरा हा सण 5 ऑक्टोबरलाच साजरा करावा असे ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात.
दसऱ्याचे शुभ मुहूर्त कोणते...?
या प्रश्नाला उत्तर देताना ज्योतिष अभ्यासक विजय जोशी सांगतात, दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या दिवसाचा प्रत्येक क्षण हा शुभ मुहूर्ताप्रमाणे आहे. त्यात दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे, म्हणूनच आपण त्याला विजयादशमी म्हणतो त्यामुळे या दिवशी कुठलेही कार्य सुरु केल्यास ते कुलस्वामिनी कृपेने नक्कीच यशस्वी होते. यादिवशी सोने, वाहन यासह नविन वस्तूंची खरेदी करणे हे उत्तम. त्यामुळे दसऱ्याला विशेष मुहूर्ताची वाट न पाहता संपुर्ण दिवसात आपण मनातील कार्ये श्रद्धेने व आत्मविश्वासाने पुर्ण करावी असे श्री. जोशी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.