इचलकरंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा : अश्‍विनी कणेकर गेट परीक्षेमध्ये देशात पहिली

 Ashwini Kanekar came first in the country in the gate examination B Tech of DKTE textile education marathi news
 Ashwini Kanekar came first in the country in the gate examination B Tech of DKTE textile education marathi news
Updated on

इचलकरंजी (कोल्हापूर) :

 येथील डीकेटीईमधील बी.टेक. टेक्स्टाईल केमिस्ट्रीची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर ही गेट परीक्षेमध्ये देशात अव्वल ठरली आहे.   अश्विनीला देशातील नामांकीत कॉलेजिसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गेट मध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवलेली डीकेटीईची विद्यार्थीनी अश्‍विनी कणेकर ही एकमेवाव्दितीय आहे. 

 यावर्षी डिकेटीईतील तब्बल ३६ विद्यार्थी गेट मध्ये उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून गेटमध्ये उत्तीर्ण होण्याची डीकेटीईच्या यशाची परंपरा कायम आहे.
डिकेटीई मध्ये गेटच्या तयारीसाठी गेली १० वर्षे खास प्रशिक्षण वर्ग घेतले जात आहेत आणि  विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच या तयारीचा खूप उपयोग होतो अशी भावना यावेळी विद्यार्थीनीने व्यक्त केली.पदव्युत्तर शिक्षण घेवून पीएच.डी. चे शिक्षण पूर्ण करणे आणि संशोधक म्हणून करिअर करणे असा अश्‍विनीचा मानस आहे.

अशी असते गेट परीक्षा
 गेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणे हे खूप मोठे आव्हान असताना त्यामध्ये देशात सर्वप्रथम येणे हा अश्‍विनीच्या आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहेगे (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीटयूट टेस्ट इन इंजिनिअरींग) ही परीक्षा आय.आय.टी. यांच्यामार्फत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते.  या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचे अ‍ॅनालिटीकल थिंकींग, टेक्निकल नॉलेज व रिसर्च ओरिएंटेड स्किल्स याची चाचणी होते.  एकंदरीतच विद्यार्थ्यांचे बौध्दिक कौशल्य तपासले जाते.  ज्या विद्यार्थ्यांना बी.टेक. नंतर पदव्युत्तर शिक्षण नामांकीत संस्थेमधून घ्यावयाचे आहे त्यांनी गेट परिक्षेत चांगल्या श्रेणीने उत्तीर्ण होणे हे महत्वाचे आहे. गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन आणि पब्लिक सेक्टर क्षेत्रात गेट परीक्षा प्राप्त विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाते.

देशभरातून तब्बल साडेसात लाख विद्यार्थी
यावर्षी ही परीक्षा फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाली व नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये डीकेटीईची अश्‍विनी कणेकर ही टेक्स्टाईलमध्ये देशात सर्वप्रथम आल्याचे घोषीत केले. दरवर्षी या परीक्षेमध्ये पात्र होण्याचे जे परसेंटेज आहे ते खूप कमी असते. यावर्षी एकूण ७.५ लाख इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा दिली व केवळ १८ टक्के म्हणजेच एकूण १.३५ लाख विद्यार्थी पात्र ठरले व त्यामध्ये टेक्स्टाईल विभागातून अश्‍विनी हीने देशात प्रथम क्रमांक संपादन केला. तीचे सर्व स्तरावर या यशामुळे कौतुक होत आहे.  आय.आय.टी. मुंबईचे गेट एक्झाम को-ऑर्डिनेटर यांनी भ्रमणध्वनीव्दारे अभिनंदन केले.    


डीकेटीईच्या तिच्या चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये देखील ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत आलेली आहे. डिकेटीई मध्ये अ‍ॅटोनॉमसमुळे जगामध्ये वेगाने होत असलेल्या तंत्रज्ञानामधील बदलांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे. वेगवेगळया रिसर्च इंडस्ट्री मधील उच्च तंत्रज्ञ व उच्चविभुषीत प्राध्यापक यांना तज्ञ म्हणून बोलावून विद्यार्थ्यांना गेस्ट लेक्चर च्या माध्यमातून अधिकचे ज्ञान उपलब्ध करुन देण्यात येते व विविध औद्योगिक भेटीबरोबरच अनेक विषयावर कार्यशाळा, चर्चासत्रे, सेमिनार आयोजित करुन इंडस्ट्रीजमधील व्यक्तींशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणली जाते. या सर्वाचा एकत्रित फायदा या विद्यार्थ्याना अशा परिक्षेमध्ये होतो.

 विद्यार्थीनीस संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष,आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्यासवे सर्व विश्‍वस्त, डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील, प्रा.डॉ.एस.बी. व्हनबटटे, प्रा.डॉ.वाय.एम. इंडि, प्रा.आर.एल. गोटीपामूल तसेच सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन मिळाले. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.