कोल्हापूर : ‘आयपीएल’च्या १३ व्या हंगामाला सुरवात झाली आहे. प्रत्येक संघाच्या पाठीराख्यांमधील सोशल वॉरला आता सुरवात झाली. सामन्यापूर्वी आणि सामान्यानंतर सोशल मीडियावर माध्यमांवर या पाठीराख्यांमध्ये संघाप्रतीच्या प्रेमाला ऊत आला आहे.
कोरोनाच्या सावटातच ‘आयपीएल’ला सुरवात झाली. अनेक नियमांच्या अधीन राहून खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत प्रेक्षकांना मात्र मैदानावर प्रवेश नाही आहे. मात्र, पहिलाच सामना रंगतदार झाल्याने या स्पर्धेची सुरवात धमाकेदार झाली. घरातील टीव्ही, हातातील मोबाईल ते काहींनी तर स्वतंत्र स्क्रीनची व्यवस्था करीत सामन्याचा आनंद लुटण्याची तयारी केली आहे.
सामन्याच्या सुरवातीला समाजमाध्यमांवर रंगणारा कलगीतुरा सामन्या दरम्यान कल बदलेल, तसा बदलत राहतो. यात अनेक समाजमाध्यमांचा आधार घेताना विविध समाजमाध्यमांचे डीपी, स्टेटस, टेक्स्ट आणि व्हिडिओ स्टेटसवरून संघाच्या पाठिंब्याचे, तर विरोधी संघांची टर्रर्र उडवण्यात धन्यता मानली जाते. समाजमाध्यमांवर घडणाऱ्या या घटनांमुळे काही वेळा वादाचे प्रसंग घडत असून, याचे पर्यवसान मारामारीत झाले आहे.
मारहाणीचे प्रकार
गतवर्षी सामन्यानंतर विरुद्ध संघाच्या समर्थकाला मारहाणीचा प्रकार झाला होता. यानंतर दोन्ही संघांच्या समर्थकांत हाणामारी झाली होती. असे प्रकार शिये, राजारामपुरी, पंचगंगा नदी परिसर या ठिकाणी झाले होते. नंतर हे प्रकरण आपापसातील सामंजस्याने निकाली काढण्यात आले होते.
पोस्टर वॉर
आयपीएल स्पर्धेतील सहभागी संघांच्या समर्थकांत समाजमाध्यमांवरच नव्हे, तर प्रत्यक्षात पोस्टर वॉर रंगले आहे. शहरातील अनेक भागासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी चाहत्यांनी आवडत्या संघाचे आणि संघ नायकाचे पोस्टर लावले आहेत. सामन्यानंतर अनेकदा या पोस्टरसमोर येऊन समर्थक आनंद व्यक्त करतात.
पोलिसांचे लक्ष
सध्या कोरोनामुळे एकत्र येऊन आनंद साजरा करायला मनाई आहे. मात्र, आवडता संघ विजयी झाल्याच्या आनंदात गर्दी केल्यास आणि शासनाच्या नियमांचा भंग केल्यास कारवाई होईल.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.