पॅरिस : कोरोनाला रोखण्यासाठी विविध लसी, उपचार पद्धतींचा जगभर वापर होत असतानाच आणखी एका थेरेपीचा वापर उपयुक्त ठरत असल्याचे संशोधक आणि डॉक्टरांना दिसून आले आहे. श्वास लागणे हे कोरोनाचे एक लक्षण आहे. यावर स्टेम सेल (मूल पेशी) थेरेपीचा वापर केल्यास व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के असल्याचे सिद्ध झाले आहे.
ऑस्ट्रेलियातील मेसोब्लास्ट लिमिटेड या कंपनीने याबाबत संशोधन केले आहे. अमेरिकेच्या औषध प्रशासन विभागानेही या उपचाराचा प्रयोग करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीला व्हेंटिलेटर लावण्यात आले तर, त्यातून ते बाहेर येण्याचे प्रमाण ९ टक्के आहे. अशा रुग्णांचे वाचण्याचे प्रमाणही केवळ १२ टक्के आहे. त्यामुळेच स्टेम सेल थेरेपीच्या यशापयशाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या थेरेपीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातही प्रयोग केले जाणार आहेत.
कोणत्या प्रकारच्या रुग्णांना उपयुक्त?
श्वास घेण्यास त्रास होणे हे कोरोनाचे एक लक्षण आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा विषाणू इतर पेशींना नष्ट करतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. अशा प्रकारचा श्वसनाचा त्रास होऊन गंभीर प्रकृती झालेल्या रुग्णावर स्टेम सेल थेरेपीचा वापर केला जाऊ शकतो.
औषध कसे काम करते?
हे औषध एमएलसी या जुन्या स्टेम सेलवर (मूल पेशी) लक्ष केंद्रित करते. रक्तवाहिन्यांच्या जवळ असलेल्या या पेशी उतींचा नाश होणे, त्या दुरुस्त करणे आणि प्रतिकारशक्तीशी निगडित असतात. कोरोनाचा विषाणू शरीरातील पेशींना इजा (उष्णता निर्माण करून जाळतो) करतो. हे औषध इजा पोहोचविणाऱ्या घटकांची (सायटोकाइन्स) निर्मिती रोखते आणि उष्णता निर्माण होण्यास रोखणाऱ्या घटकांची निर्मिती करते, असा संशोधकांचा दावा आहे.
कसे होतात उपचार?
रुग्णाच्या रक्तवाहिनीमध्ये रिओनसिल हे औषध इंजेक्शनद्वारे दोन वेळेस दिले गेले.
व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाग्रस्तांवर या औषधाचा प्रयोग केला गेला
औषध दिल्या गेलेल्या १२ रुग्णांपैकी ९ रुग्णांचे व्हेंटिलेटर १० दिवसांच्या आत काढून टाकण्यात आले. यातील सात जणांना घरीही सोडण्यात आले आहे.
या रुग्णांवर नियमित उपचारही करण्यात आले होते.
प्रयोगाचा परिणाम
स्टेम सेल थेरेपीचा प्रयोग ११०० रुग्णांवर करण्यात आला असून त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे डॉ. फ्रेड ग्रोसमन यांनी सांगितले. यातील बहुतांश रुग्णांची श्वसन प्रक्रिया सुधारल्याचेही त्यांनी सांगितले.
अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (श्वसनाला अडथळा)
३० ते ६० टक्के कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूला कारणीभूत
यामध्ये शरीरातील प्रतिकारशक्ती विषाणूविरोधात अतिप्रमाणात कार्यरत होऊन अनियंत्रित प्रमाणात प्रथिने सोडतात
यामुळे फुप्फुसांच्या पेशींमध्ये
जळजळ निर्माण होते
हवेच्या पिशव्यांमध्ये द्रव साचण्यास सुरवात होते
यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा करण्यात फुप्फुसांना अडथळे येतात
या जळजळीवर उपचार नाहीत
असे संशोधन व्हेंटिलेटरवर ठेवलेला रुग्ण
जळजळ कमी होते
प्रतिकारशक्ती वाढते
यामुळे श्वसनामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात.
वेगाने वाढ होते
अत्यंत थंड वातावरणात साठवता येतात आणि सहज तत्काळ वापरासाठी उपलब्ध होऊ शकतात.
हे पण वाचा - मुंबईहून ते आले, वेशीवर गाव जमले
प्रयोग : रुग्णाला दर ४८ तासांनी नाळेतून काढलेल्या मेसेनकायमल स्टेम सेलचा इंजेक्शनद्वारे पुरवठा केला जातो. यामुळे श्वसन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
हे पण वाचा - पुणे, मुंबईतील शूटिंग कोल्हापुरात?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.