नातीच्या वयाच्या मुलीवर केला अत्याचार ; न्यायालयाने ठोठावली जन्मठेप 

Birth control to man kolhapur news
Birth control to man kolhapur news
Updated on

कोल्हापूर - अल्पवयिन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वृद्धास जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची व 50 हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रकांत दत्तात्रय पेंडूरकर (वय 55) असे त्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. अमृता पाटोळे यांनी काम पाहीले. 

करवीर तालुक्‍यातील एका गावात चंद्रकांत पेंडूरकर राहतो. त्याने 2016 मध्ये आपल्या नातीच्या वयाचाच्या मुलीला गळा दाबून ठार मारीन अशी भिती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यात पीडित मुलगी गर्भवती झाली. याबाबतच मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादेनुसार करवीर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक पुष्पलता मंडले यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग 1) एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात सुरू झाले.

सरकारपक्षातर्फे ऍड. अमृता पाटोळे यांनी 11 साक्षीदार तपासले. या सर्व साक्षीदारांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर चंद्रकांत पेंडूरकरला दोषी ठरवले. त्याला जन्मठेपेची शिक्षा व 50 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावून दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले. या कामात सरकार पक्षाला करवीर पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलिस कर्मचारी किरण माने, आर. डी. बंडगर, सहायक फौजदार एम. एम. नाईक यांचे सहकार्य मिळाले. 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.