आवळीतील त्या विवाहितेचा खूनच ; प्रियकरानेच गळा दाबून टाकले विहिरीत 

boyfriend killed lover in kolhapur
boyfriend killed lover in kolhapur
Updated on

बोरपाडळे - आवळी (ता. पन्हाळा) येथील सौ. सविता संजय पाटील (वय 32) हिचा मृतदेह गावविहिरीत बुधवारी (ता. 4) पाण्यामध्ये तरंगताना आढळला होता. आत्महत्या की खून यामध्ये पोलिसांसह ग्रामस्थ आणि नातेवाईकही संभ्रमात होते; पण कोडोली पोलिसांनी केवळ 24 तासांतच खुनाचा छडा लावत प्रियकर नागेश बाबासो पाटील (वय 33, रा. आवळी) यानेच खून केल्याचे उघड झाले. 

कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सौ. सविता संजय पाटील रविवारी (ता. 1) सांयकाळी 7 च्या सुमारास घरातून बाहेर पडली. घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर तिचा शोध लागाला नाही. अखेर ती हरवल्याची फिर्याद पती संजय गणपती पाटील याने कोडोली पोलिसांत दिली होती. बुधवारी सकाळी घरासमोरील हाकेच्या अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह सापडला होता. वैद्यकीय अहवालानुसार सविताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संशयावरून पती संजय पाटील याच्यासह अन्य दोघांना ताब्यात घेतले; पण पोलिसांच्या जलद तपासाने सविताचा प्रियकर नागेश याने तिला रविवारी (ता. 1) सायंकाळी घराबाहेर बोलावून घेतले व तिचा गळा दाबून निर्घृण खून करून मृतदेह खांद्यावरून नेऊन गावविहिरीत टाकल्याचे कबूल केले. सविताच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सासू-सासरे असा परिवार आहे. 

शाहूवाडी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक अनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे, प्रदीप यादव, भैरू माने, हिंदुराव केसरे, रवी कांबळे, विश्वास चिले आदींचे मोलाचे योगदान मिळाले. 

अनैतिक संबंधाचा संशय 

मृत सविताचे संशयित नागेश याच्याशी गेल्या 9 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. संशयित नागेश याला मात्र सविताचे आणखी दोघांशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून तो तिच्याशी वाद घालत होता. याच संशयावरून नागेशने तिचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वैद्यकीय अहवालानुसार खुनाचा छडा लावत 24 तासांत संशयिताला पकडले.

संपादन - धनाजी सुर्वे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.