हवे ते महाविद्यालय देतो, पण प्रवेश घ्या ; शिक्षण विभागाची विद्यार्थ्यांना विनंती

college request to students you want to college we give to but admission done in kolhapur
college request to students you want to college we give to but admission done in kolhapur
Updated on

कोल्हापूर : अकरावीत महाविद्यालयीन जीवनाची सुरवात करताना प्रत्येकाची अमुक एका महाविद्यालयातच प्रवेश मिळावी, अशी अपेक्षा असते. अर्थात त्यात गैरही काही नाही, मात्र पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने प्रवेशच नको, अशी मानसिकता विद्यार्थ्यांची तयार झाली आहे. याच कारणामुळे पसंतीचे महाविद्यालय देतो; पण प्रवेश घे, असे म्हणण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

पूर्वी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावीला प्रवेश म्हटले की विद्यार्थ्यांच्या उड्या पडायच्या. अमुक एक महाविद्यालय मिळावे यासाठी हवी तेवढी देणगी आणि शुल्क भरण्याची विद्यार्थी तसेच पालकांची मानसिकता असायची. कधी एकदा नवी कपडे घालायला मिळतात आणि अकरावीचे वर्ग सुरू होतात, याची उत्सुकता राहायची. कॉलेजकुमार म्हणून एक वेगळाच रुबाब प्रत्येकाच्या अंगी असायचा. काळाच्या ओघात व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व वाढत गेले.

आयटी, फूड इंडस्ट्रीजला महत्त्व आले तसा विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम बदलत गेला. केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली गेली. विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंती क्रम देण्यास सांगितले गेले. गुणवत्तेनुसार ज्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले त्यांनी प्रवेश घेतले मात्र ज्यांना असे महाविद्यालय मिळाले नाही त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला आहे. प्रवेशाचे आकडे पाहता नऊ हजार आठशेपैकी ४४८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूण क्षमतेच्या केवळ पन्नास टक्के प्रवेश झाले आहेत. पहिल्या फेरीत आज ना उद्या विद्यार्थी प्रवेश घेतील या आशेवर प्रवेश समितीचे सदस्य आहेत. तसे न झाल्यास ‘वेटींग’ वरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.

"केंद्रीय पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली गेली. विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंती क्रम देण्यास सांगितले गेले. त्यानुसार पन्नास टक्के प्रवेश झाले आहेत. पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. वाढीव मुदत संपल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांची यादी निश्‍चित केली जाईल." 

- सुभाष चौगुले, सहायक शिक्षण संचालक

शाखानिहाय प्रवेश

  • विज्ञान शाखा                     २१२१ 
  • वाणिज्य इंग्रजी माध्यम         ७०७ 
  • वाणिज्य मराठी                   ९०३
  • कला शाखा                        ६९८ 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.