कोल्हापूर : जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी १२ हजारांहून अधिक ट्रक व ट्रॅक्टर, १४० ऊस तोड मशीन व ४ हजार ८५९ बैलगाडींचे नियोजन आहे. हे नियोजन कोरोना येण्याआधी होते. कोरोनामुळे सध्या ऊस तोड मशीन व्यतिरिक्त ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्यांची जुळवाजुळव करताना साखर कारखान्यांना कसरत करावी लागत आहे. या सर्व वाहनांशी कोरोनासाठी जाहीर केलेल्या नियम, अटीनुसार करार करण्यासाठी कारखान्यांची दमछाक होत आहे.
यावर्षी सुमारे १० हजार हेक्टर उसाचे वाढीव क्षेत्र आहे. यातच कोरोनामुळे ऊस तोडणीसाठी मजुरांची वानवा असणार आहे. त्याचप्रमाणे बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांची संख्या कमी असणार आहे. गेल्यावर्षीच शेतकऱ्यांना पाळी पत्रकानुसार ऊस तोडणी मिळाली नाही. यंदाच्या हंगामातही कारखान्यांसमोर अशी भीषण परिस्थिती उभी आहे. मजूर नाहीत, त्यासोबत लागणारी सक्षम यंत्रणाही वेळेत उभी करता आली नाही, तर पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. साखर कारखान्यांकडून ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ट्रक, ट्रॅक्टर आहेत, अशा शेतकऱ्यांनी स्वत:चे गट तयार करून कारखान्यांकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.
सक्षम यंत्रणेसाठी कारखान्यांची होणार कसरत
साखर कारखानानिहाय आवश्यक यंत्रणा
साखर कारखानानिहाय आवश्यक यंत्रणा ट्रॅक्टर व ट्रक बैल
गाडी ऊसतोड मशीन
तात्यासाहेब कोरे (वारणा) ९५० २५० १५
भोगावती (परिते) ७७० १०० ३
राजाराम (कसबा बावडा) ३५० २६० ६
शाहू (कागल) ८७० ४०० १०
दत्त (शिरोळ) ६९० ५०० २०
दूधगंगा-वेदगंगा (बिद्री) ८८५ १५० ४
नलवडे शुगर (हरळी) ३५० २५० ०
जवाहर शेतकरी (हुपरी) ९०० ५५० ३३
मंडलिक (हमीदवाडा) ४६५ ४०० २
कुंभी-कासारी (कुडित्रे) ८०० ३०० ४
दे.भ.र. कुंभार (इचलकरंजी) ५६५ २५० १०
शरद कारखाना (नरंदे) ४४० ४०० १०
कारखाना ट्रॅक्टर व ट्रक बैल
गाडी ऊसतोड मशीन
आजरा (गवसे) ० ० ०
उगार (शाहूवाडी) ५४५ १५ ५
डॉ. डी. वाय. पाटील (गगनबावडा) ४७२ ० ०
गुरुदत्त (टाकळीवाडी) ४७५ ४७० ८
इको केन (म्हाळुंगे) ४८५ ० ०
हेमरस (राजगोळी) ५२५ ० ३
महाडिक शुगर (फराळे) ३५० ० ०
संताजी घोरपडे (कागल) ० १४ ०
दालमिया शुगर (आसुर्ले-पोर्ले) ९५५ ३०० ७
इंदिरा (अथणी शुगर, तांबाळे) ४४५ ० ०
दौलत (चंदगड) ५४० २५० ०
एकूण १२८२७ ४८५९ १४०
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.