कोरोनावर कवित्व : मौत से ऑख मिलाने की जरूरत है क्या...?

corona entertainment poem poetry posts on social media kolhapur marathi news
corona entertainment poem poetry posts on social media kolhapur marathi news
Updated on

फुलेवाडी(कोल्हापूर) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉक डाऊन करण्यात आला आहे.त्यामुळे प्रत्येक जण घरात बसून आहेत. दिवसभरात घरी टीव्ही पहात आणि सोशल मीडियाचा वापर करत अनेक जण आपला वेळ घालवत आहेत.या मोकळ्या वेळेत कोरोनावर प्रबोधन पर शायरी,काव्य,चारोळ्या तसेच विनोदी चुटके अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पडत आहेत.


कोरोना संसर्गामुळे होत असल्याने घराबाहेर पडू नका असे वारंवार आवाहन प्रशासनाकडून होत असले तरीही लोक रस्त्यावर फिरत आहेत. यावर लिहिले आहे.

 
"घर से निकलने की जरुरत है क्या,
 मौत से ऑख मिलाने की जरूरत है क्या?
दिल बहलाने के लिए घर में वजह  
है काफी,


युही गलियोमें भटकने जरुरत है क्या?"
 सुनसान शहरे,गर्दी विना रस्ते पाहून लिहीलेय
"ये शहरों का सन्नाटा बता रहा है, इंसान ने कुदरत को नाराज बहुत किया है!"


 शहरातून प्रत्येकाने गावाकडे धाव घेतल्याने लिहितात
"गांधीजींचा एकच नारा,
गड्या आपला गाव बरा."
 डी.एस.कांबळे म्हणतात
'चायनाचे हे मॉडेल 
गांभीर्याने घ्यावे,
कोरोना युद्ध समजून 
खंबीरतेने लढावे." 


चारोळीकार बाबा कदम लिहितात,
"दबा धरून बसलाय कोरोना ओलांडू नका लक्ष्मण रेषा, स्वतःबरोबर प्रियजनांची
क्षणात उडेल दुर्दशा."


 कोरोनाने घरात बसून बसून मन बेचैन होत आहे यावर एक जण म्हणतोय,


बाहेर कोरोना,घरात करमेना आता काय करावे कळेना. माझ्यातील कवी जागा झाला आहे कि,
मेंदूवर परिणाम झाला आहे तेही कळेना.


 कोरोनामुळे शहरे ओस पडली व खेडी तुडूब भरली आहेत यावर लीहीलेय
"स्मार्ट सिटी-वातानुकूलित फ्लॅट उदास वाटला,
मृत्यू समोर आल्यावर 
शेवटी गावच कामास आला,
पैसा-प्रतिष्ठा घडीचा खेळ आहे, गावच्या गल्लीत माणुसकीला वेळ आहे.

निशा साळोखे लिहितात,
नाटकं,सभा,संमेलन
कोल्हापूरकर याचे दर्दी,
पण आता सुरक्षित रहा घरी 
नको वाढायला सीपीआरमध्ये गर्दी.
संगम कासारे लिहितात
"कराया कोरोनावरती मात
गप्प रहावे बसुनी घरात,
माझ्या बंधू-भगिनींनो
लक्ष्मण रेखा मारून घ्या दारात."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.