अरेरे... चार महिन्याच्या बाळाला झाला कोरोना...

Corona had a four month old baby gulbarga
Corona had a four month old baby gulbarga
Updated on

बेळगाव - गुलबर्ग्यात चार महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. आईपासून बाळाला संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्हचे सात रुग्ण आज (ता.22) आढळले. त्यापैकी आई आणि तिच्या चार महिन्याच्या चिमुरड्याला लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गुलबर्ग्यातील कोरोना कक्षात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

राज्यात चोवीस तासात सात रुग्ण वाढले आहेत. आरोग्य विभागातर्फे बाधितांची माहिती जाहीर केली आहे. बेंगलोर जिल्हात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे अनुक्रमे वय 54, 28 आहे. त्यापाठोपाठ गुलबर्ग्यात पाच रुग्ण आढळले आहेत. त्यांचे वय 46, 57, 35, 4 महिने, 26 आहे. त्यापैकी गुलबर्गा येथील 35 वर्षिय महिलेला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे आज (ता.22) आढळले. या महिलेपासून चार महिन्याच्या बाळाला कोरोना लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. बाळ व तिच्या आईला गुलबर्गा येथील कोरोना कक्षात दाखल केले आहे.

बेंगलोर जिल्ह्यात दान आणि गुलबर्गा जिल्हात पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 425 झाली आहे. 17 जणांचा मृत्यू झाला असून 129 जणांना घरी सोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.