कोल्हापूर ः साहेब, कुठे गेले तरी फिल्डवर, केव्हा येणार तर काही कल्पना नाही. मोबाईल नंबरही स्वीच ऑफ लागतो. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांबाबत हा सातत्याने येणारा अनुभव, मात्र प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मोबाईल स्वीच ऑफ करणाऱ्यांना चाप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कामाच्या वेळी मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे आढळून आल्यास कारवाईचा इशारा डॉ. बलवकडे यांनी दिला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पालिकेतील अधिकारी आणि त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ असणे याबाबत सातत्याने तक्रारी आल्या. महापालिका सभागृहात त्यावर अनेकवेळा चर्चा झाली. नगरसेवकांनी वेळोवेळी आक्षेप घेतला. "वर्क लोड' हा प्रत्येक अधिकारी तसेच कर्मचाऱ्यावर आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही. सकाळी ड्रेनेज तुंबण्यासह पाणी न येणे, गटारीची स्वच्छता नाही. कोंडाळा भरून वाहतो आहे, असे फोन सुरू होतात. प्रामूख्याने आरोग्य विभागावर अधिक ताण आहे. ज्यांच्या फोनमुळे त्रास होतो, असा सातत्याने तक्रारी असतात. ते सभागृह आता बरखास्त झाले आहे.
काहीना एकतरी फोन कट करण्याची, उत्तर न देण्याची अथवा मोबाईल बंद ठेवण्याची सवय आहे. एखादे महत्वाचे काम असेल तर संपर्क कसा करायचा, असा वरिष्ठ अघिकाऱ्यांना प्रश्न पडतो. मंत्र्यांचे काही निरोप असतील अथवा तातडीने काही घटना घडल्यास संपर्क साधता येत नाही. अग्निशमन दल ही चोवीस तास चालणारी सेवा आहे. पाणीपुरवठा विभागाला 24 तास हाय अलर्ट राहावे लागते.
नगररचना, शहर अभियंता कार्यालय. उपशहर अभियंता. कनिष्ठ अभियंता, लेखापाल, लेखापरीक्षक, नगरसचिव यांच्यावर सातत्याने कामाचा ताण असते. अलीकडे काही अधिकारी तसेच जबाबदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले आहे.
मोबाईल बंद असल्याने कोणतेही काम महत्वाचे खोळंबून राहू नये, यासाठी आयुक्तांनी कठोर भुमिका घेतली आहे. महापालिकेची मुख्य इमारत अर्थात मुख्यालय परवानगीशिवाय सोडू नये, असेही त्यांनी बजावले आहे.
मोबाईल बंद न करण्याविषयी विभागप्रमूखांच्या बैठकीत नुकतीच सूचना देण्यात आली आहे. यापुढे ज्यांचे मोबाईल बंद असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. पुर्व परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्यासंबंधी सूचना दिली गेली आहे.
-प्रशासक, डॉ. कादंबरी बलकवडे
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.