गडहिंग्लज : संसार म्हटले की भांड्याला भांडे लागायचेच, असे म्हटले जाते. पण, हा भांड्यांचा आवाज कशामुळे होतो हेही तितकेच महत्त्वाचे. आर्थिक कारण हे त्यापैकी एक. या कारणावरून संसारात पूर्वीपासून कुरबुरी होत्याच. पण, गेल्या दोन महिन्यांत त्यात वाढ झाल्याचे वास्तव समोर येत आहे. महिलांच्या तक्रारी जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. लॉकडाउनमुळे अनेकांचे अर्थकारण बिघडले आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.
कुटुंबात वादाचे प्रसंग घडतात. अन्य सदस्यांकडूनही त्रास वाढतो. त्यासाठी कोणतेही कारण निमित्त ठरते. अशा वेळी वाद विकोपाला जाऊ नये, संसाराची गाठ तुटू नये यासाठी समुपदेशनाची गरज असते. शासनाने तालुकास्तरावर अशी समुपदेशन केंद्रे सुरू केली आहेत. लॉकडाउनच्या काळात येथे तक्रारींचे प्रमाण फारच घटले होते. पण, अनलॉकनंतर त्यात पुन्हा वाढ झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांत समुपदेशन केंद्राकडे आलेल्या तक्रारींकडे पाहिले तर आर्थिक कारणावरून वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाउनपूर्वी येणाऱ्या तक्रारींच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे. आर्थिक विवंचनेतून वाद टोकाला जातात. त्यामुळेही तक्रारी आल्या आहेत. तसेच पती, सासूकडून माहेरून पैसे आणण्याच्या मागणीमुळेही तक्रार करण्यात आल्याचे दिसून येते. लॉकडाउननंतर अनेकांचे रोजगार गेले. छोटे व्यावसायिकही अडचणीत आले. त्यामुळे अर्थचक्रच थांबले. शिलकीवर काही महिने ढकलले. पण, त्यानंतर आर्थिक समस्या भेडसावत आहेत. त्याचाच परिणाम वाद होण्यात आणि त्यातून तक्रारी वाढण्यात झाला आहे.
न आलेल्या तक्रारीही...
कौटुंबिक वादात समेटासाठी समुपदेशन केंद्रे सुरू आहेत. पण, सारेच वाद या केंद्रापर्यंत पोचतात, असे नाही. महिलांकडून धाडस न दाखविल्याने किंवा अन्य कारणाने तक्रार न करण्याचे प्रमाणही मोठे आहे. शिवाय, काही तक्रारी गावपातळीवरच तंटामुक्त समितीत मिटविल्या जात होत्या. पण, सध्या या समित्याही थंड पडल्या आहेत. त्यामुळे समुपदेशन केंद्रापर्यंत न पोचलेल्या तक्रारीही असण्याची शक्यता आहे.
तक्रारी निराकरण करण्याचे काम सुरू
समुपदेशन केंद्राकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी येतात. गेल्या दोन महिन्यांत आर्थिक कारणावरून होणाऱ्या वादाच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी निराकरण करण्याचे काम सुरू आहे.
- विलास देसाई, समुपदेशक, गडहिंग्लज केंद्र
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.