दसरा, दिवाळी आणि ईदची खरेदी करा आता रात्री नऊपर्यंत

District Collector Daulat Desai allowed shops and establishments in the kolhapur district continue till 9 pm
District Collector Daulat Desai allowed shops and establishments in the kolhapur district continue till 9 pm
Updated on

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील दुकाने आणि आस्थापना रात्री नऊपर्यंत सुरू ठेवण्याला आज सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी परवानगी दिली. 


दसरा आणि दिवाळीमुळे ग्राहकांची बाजारात ठराविक वेळेतच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे सायंकाळी सातपर्यंत असलेली दुकानांची वेळ दोन तास वाढवून नऊपर्यंत करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राजारामपुरी व्यापारी असोसिएशनद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तेंव्हा श्री. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, त्यांना निवेदन देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार राजारामपुरी असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या पुढाकारातून ही मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत या मागणीचे निवेदन दिले. दसरा, दिवाळी, ईद असल्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी अधिक वेळ पाहिजे आहे. त्यामुळे ही वेळ वाढविण्याची विनंती करीत असल्याचे सांगितले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.