डोपिंगचे ग्रहण संघटनात्मक पातळीवर सुटावे ; पालक, पैलवानांत हवी जनजागृती 

doping wrestling kolhapur
doping wrestling kolhapur
Updated on

कोल्हापूर  : महाराष्ट्राचे मल्ल अतिरिक्त प्रमाणात करत असलेल्या डोपिंगमुळे पैलवानांसह, कुस्ती परंपरेलाही धक्का पोहचत आहे. रांगड्या मल्लांना लागलेलं डोपिंगच ग्रहण लवकर सोडवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर तसेच पालक आणि प्रशिक्षणस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. या प्रश्नाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता महाराष्ट्रातील मल्लांच्या पुढच्या कारकिर्दीला अडचणीत आणणारे ठरेल. 

पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमधील कुस्तीगीर स्पर्धात्मक सामन्यांच्या दृष्टीने आखणी करतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलिंपिक स्पर्धेचे ध्येय समोर ठेवून ते कामगिरीचा आलेख कायम ठेववात; परंतु आपल्या राज्यातील मल्ल फक्त "महाराष्ट्र केसरी' तसेच इतर खुल्या स्पर्धेत लढण्याची व जिंकण्याची इच्छा ठेवतात. राज्यातील कुस्ती क्षेत्रात निकोप व निरोगी ईर्षेऐवजी डोपिंग करून कमी वेळात मोठा मल्ल होण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. यातूनच उत्तेजक पदार्थाचे पेव फुटले आहेत. यावरच अर्थकारणही मोठे आहे. मल्लांच्या अज्ञानाचा फायदा घेत 1 हजार ते 5 हजारांपर्यंत माथी मारण्याचा उद्योग मध्यस्थाकडून होत आहे. 10 हजारांपासून ते 80 हजारांपर्यंतचे डोपिंगचे कोर्सेस मल्ल करत आहेत. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले कुस्तीत नशीब आजमावतात. खुराकासाठी अनेकांना घरून पैसा पुरवला जातो; परंतु या पैशाचा उपयोग खुराक खाण्यासाठी न करता मल्ल सप्लिमेंट प्रोटिन्स व डोपिंगवर खर्च करतात. हे थांबवण्यासाठी मल्लांत जनजागृती करणे गरजेचे आहे. 

प्रशिक्षक व कुस्तीगीर परिषदेची भूमिका महत्त्वाची 
राज्यातील विविध निवासी आखाड्यात हजारो मल्ल सराव करतात. या मल्लांवर वस्ताद मंडळींचे पूर्ण नियंत्रण असते; परंतु अलीकडे मल्ल-वस्तादातील परस्परसंबंधाला खीळ बसत चालली आहे. प्रशिक्षक या डोपिंगकडे दुर्लक्ष करत अनिष्ट कृतीला प्रोत्साहनच देत आहेत. महाराष्ट्रातील मल्लांची मातृसंस्था म्हणून "महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद' काम करते. या संस्थेच्या माध्यमातून डोपिंगविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. परिषदेकडून होणारी "महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा आहे आणि इतर मोठ्या स्पर्धेवेळी मल्लांची सक्तीची डोपिंग चाचणी घेण्याची गरज आहे. 

हे करावे 
* आखाड्यात वस्ताद मंडळींनी ठेवावे लक्ष 
* कुस्तीगीर परिषदेची "डोपिंग' कमिटी करावी 
* मल्लांचे प्रबोधन व जनजागृतीसाठी शिबिरे घ्यावीत 
* अनधिकृत सप्लिमेंट, स्टेरॉइड्‌स वितरकांवर कारवाई 
* पालकांनी डोपिंगमुक्त प्रशिक्षण केंद्रांचा आग्रह धरावा 

  डोपिंगमुक्त कुस्ती करण्यासाठी परिषद प्रयत्न करत आहे. यंदा मल्लांची सक्तीची डोपिंग चाचणी घेतली जाणार आहे. यात दोषी आढळल्यास मल्लांसह, त्याचे प्रशिक्षक तसेच जिल्हा संघावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. "नाडा'ची टीम बोलवण्यात येणार आहे. 
- बाळासाहेब लांडगे- सरचिटणीस, राज्य कुस्तीगीर परिषद. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.