पक्षांचा नाद सोडूया आणि घर टू घर प्रचार करूया ; कार्यकर्ते वाढवताहेत इच्छुकांचे मनोबल

election of kolhapur municipal corporation activist planning voters
election of kolhapur municipal corporation activist planning voters
Updated on

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी पक्षांतरे करायला सुरवात केलीच आहे. तरीही अपेक्षित पक्षांकडून उमेदवारी मिळेल की नाही, याबाबतीत अनेकांना साशंकता वाटत आहे. त्यामुळे ते कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करत आहे. अशावेळी कार्यकर्तेही लाखमोलाचे सल्ले देत असून, पक्षांचा नाद सोडूया आणि पुन्हा घर टू घर प्रचार करूया, असे सांगत कार्यकर्ते इच्छुकांचे मनोबल वाढविताना दिसत आहेत.

महापालिकेची निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राजकारणात प्रवेश देणारी प्रमुख प्रक्रिया आहे. इतके वर्षे कार्यकर्ते म्हणून काम केल्यानंतर आता महापलिका सभागृहात जाउन शहराच्या प्रश्‍नांवर आवाज उठविणे, आपल्या प्रभागाचा विकास करणे, अशी स्वप्ने घेउन अनेकजण ही निवडणूक लढविणार आहेत. परंतु, निवडणूक लढवायची म्हटल्यावर अनेक प्रकारची तयारी करावी लागते. त्यात राजकीय पक्षाची उमेदवारी मिळविणे हा एक महत्त्‍वाचा टप्पा आहे. राजकीय वारे ज्या पक्षाच्या बाजूने वाहिल त्या पक्षाची उमेदवारी मिळविण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. २००५ मध्ये जनसुराज्यची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करायचे? त्यांनतर २०१० मध्ये दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारी मिळवायचा प्रयत्न झाला. २०१४ मध्ये राजकीय सत्ता बदलली होती. त्यामुळे २०१५ मध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकांनी प्रयत्न केले होते.

आता पुन्हा राजकीय वारे महाविकास आघाडीच्या दिशेने वाहत असल्याने दोन्ही कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारीसाठी खेटे मारले जात आहेत. परंतु, एका पक्षात एकापेक्षा जादा उमेदवारी असल्याने नेमकी आपल्याला उमेदवारी मिळेल का? राजकीय पक्षाच्या अंडरस्डॅटिंगमध्ये आपला बळी जाणार नाही ना? अशा एक ना अनेक शंका इच्छकि मंडळींना पडत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची, लढायचे तर निश्‍चितच आहे; पण पक्षाची उमेदवारी बेभरावशाची आहे. पक्षाने जर विश्‍वासघात केला तर ऐनेवळी काय करायचे? अशा अनेक प्रश्‍नांनी इच्छुकांना ग्रासले आहे. त्यामुळे आता इछूक मंडळी थेट कार्यकर्त्यांशीच चर्चा करून नेमके काय करायचे? याचा कानोसा घेत आहेत.

कार्यकर्त्यांनी मात्र काहीही झाले तरी आपली तयारी झाली आहे. नेत्यांच्या पाठीमागे फिरून वेळ घालविण्यापेक्षा मतदारांच्या भेटीगाटीत वेळ घालवूया, घर टू घर प्रचार करुया, असे सल्ले द्यायला सुरवात केली आहे. निवडणुकीची तारीखही अजून निश्‍चित नाही. त्यामुळे कितीवेळा नेत्यांचे उंबरे झिजवायचे? त्याऐवजी जास्तीत जास्त मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करुया म्हणून आता इच्छुक मंडळी मतदारांचे उंबरे झिजवत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.