एका आईने पाहिला माणुसकीचा अंत ; तिच्या टाहोनेही घरच्यांच्या हृदयाला फुटला नाही पाझर 

family ignore of worker women in kolhapur
family ignore of worker women in kolhapur
Updated on

कोल्हापूर : कोरोनामुळे अनेक ठिकाणी माणुसकीला तडा जाणाऱ्या गोष्टी घडत आहेत. शेजारी सोडाच; पण काही वेळा तर स्वतःचे नातेवाईकही आपल्या माणसाला जवळ करत नाहीत. असाच काहीसा प्रकार सहा महिन्यांच्या बाळाला बाजूला ठेवून दुसऱ्याच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या फुलेवाडी परिसरातील एका महिलेच्या वाट्याला आला आहे. 

पोटाला अवघे सहा महिन्यांचे बाळ. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोकांच्या घरची धुणीभांडी करणे, हाच काय तो आधार. अशातच ज्या घरात काम करत होती, त्या घरातील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने कार्यवाही करत योग्य उपाययोजना केल्या. हे सर्व सकाळी घडले. या सर्वांशी अनभिज्ञ असणारी आणि निव्वळ घरकाम करून उदरनिर्वाह करणारी महिला या ठिकाणी आली. जेव्हा या महिलेला येथील परिस्थिती समजली, तेव्हा मात्र तिच्या पायांखालची जमीनच सरकली. 
याच घराच्या पायरीवर ती हिरमुसून बसली. तिच्या तोंडून न फुटणारा हुंदका आणि डोळ्यांतून न थांबणारे अश्रू हे मात्र खूप काही सांगत होते. अनेकांनी तेथे येऊन तिची विचारपूस केली; मात्र प्रत्येकाने तिच्यापासून लांबच राहणे पसंत केले. थोड्या वेळाने स्वतःला सावरत तिने हकीकत सांगितली. 

सहा महिन्यांचे छोटे बाळ आहे; मला पण कोरोना झाला तर? आता मी काय करू? असे सांगताच सर्वच जण निःशब्द झाले. येथे असणाऱ्या आरोग्यसेवकांनी धीर देत योग्य ती माहिती घेतली आणि पुढील सूचना देऊन तिला घरी पाठवले. घरातील व्यक्तींनी तर परक्‍याहून अधिक वाईट व्यवहार केला. खाण्यापिण्याचे सोडाच; पण घोटभर पाण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या. लहान बाळाने भुकेने व्याकुळ होऊन फोडलेल्या टाहोनेही घरच्यांच्या हृदयाला पाझर नाही फुटला. अखेर अनेकांच्या प्रयत्नाने तिचा बाळापर्यंत जाण्याचा मार्ग मोकळा झाला. पण घरच्यांच्या या परकेपणाने ती मात्र तुटली आहे.

मानसिक खच्चीकरण
सध्या कोरोनाहूनही अधिक इतरांच्या वागणुकीचा त्रास कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबीयांना होत आहे. वाळीत टाकण्यासारख्या प्रवृत्तीने मानसिक खच्चीकरण होत असल्याचे चित्र समाजात आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()