Gadhinglaj Cancels Housing Cases Of 428 Families Kolhapur Marathi News
Gadhinglaj Cancels Housing Cases Of 428 Families Kolhapur Marathi News

गडहिंग्लजला तब्बल 428 कुटुंबांचे घरकुल रद्द

Published on

गडहिंग्लज : तालुक्‍यात प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर केलेल्या 428 कुटुंबांची घरकुले रद्द करण्यात आली. आर्थिक परिस्थिती, स्थलांतरासह विविध कारणांनी ही घरकुले रद्द झाली आहेत. याशिवाय, तालुक्‍यातील 181 कुटुंबे वेटिंगवर आहेत. आवश्‍यक बाबींची पूर्तता न झाल्यास त्यांचीही घरकुले रद्द होण्याची शक्‍यता आहे. 

प्रत्येकाला हक्काचा निवारा देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून ही योजना चालते. त्याच्या लाभासाठी शासनानेच लाभार्थी निवडले. त्यांना घरकुल बांधणीसाठी एक लाख 20 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते; तर "रोहयो'तून 18 हजार रुपये मिळतात. 2016-17 चा अपवाद वगळता गडहिंग्लज तालुक्‍याला कधीच 400 पेक्षा अधिक उद्दिष्ट मिळाले नव्हते. यंदा मात्र तब्बल एक हजार 213 घरकुलांचे उद्दिष्ट आले आहे. अन्य तालुक्‍यांच्या तुलनेत हे दुपटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे लाभार्थी मिळविताना प्रशासनाची दमछाक होते. 

दरवर्षी येणाऱ्या उद्दिष्टातून शिल्लक राहिलेले हे सर्व लाभार्थी आहेत. त्यामुळे लाभ देताना प्रशासनाचा कस लागला. शासनाचे अनुदान असले तरी बांधकामासाठी त्यापेक्षा अधिक खर्च येतो. त्यामुळे सध्या आर्थिक कुवत नसणाऱ्या 191 कुटुंबांनी घरकुल नाकारले आहे. याशिवाय, पक्के घर असणाऱ्यांची संख्या 151 आहे. त्यांचेही घरकुल रद्द करण्यात आले. स्थलांतरित, वारस नसणाऱ्या, यापूर्वी लाभ घेतलेल्या व शासकीय सेवेत असणाऱ्यांचीही घरकुले रद्द करण्यात आली आहेत. 

तडजोड शक्‍य झाल्यास... 
घरकुल मंजूर आहे. पण, जागा नसलेली 61 कुटुंबे आहेत. या कुटुंबांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याचा लाभ घेणे आवश्‍यक आहे; तर भावकीमुळे जागेचा वाद असणारी 28 कुटुंबे आहेत. गावपातळीवरील नेत्यांनी लक्ष घालून या वादात तडजोडी केल्या तर या कुटुंबांना घरकुल मिळणे शक्‍य आहे. अन्यथा, त्यांनाही अनुदानाला मुकावे लागेल. 

"त्या' गरजवंतांना मिळेल लाभ... 
शासनाने तयार केलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत समावेश नसणाऱ्या; पण घरकुलाची गरज असणाऱ्यांनी प्रपत्र "ब' भरून दिले आहे. त्यांची संख्या दोन हजार 747 इतकी आहे. त्यांची अद्याप छाननी व्हायची आहे. आता विविध कारणांनी रद्द झालेल्या कुटुंबांची संख्या 428 आहे. शिवाय, 181 जण वेटिंगवर आहेत. रद्द झालेल्या या घरकुलांचा लाभ भविष्यात प्रपत्र "ब'मधील खऱ्या गरजवंताला मिळू शकतो. 

यांचे घरकुल रद्द... 
- इच्छुक नाही.......................191 
- पक्के घर...........................151 
- स्थलांतरित.........................58 
- ऑनलाईन वारस नाही..........16 
- यापूर्वी लाभ घेतलेले.............11 
- शासकीय सेवेत...................1 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()