शिरोली दुमाला (कोल्हापूर) : सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापत आहे. गेल्या निवडणुकीला जी चूक झाली, ती पुन्हा होऊ नये, यासाठी उमेदवार हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. सर्वांच्या हाती स्मार्टफोन आल्याने प्रचार करण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी आता प्रचारही ‘स्मार्ट’ होऊ लागला आहे.
आपल्या उमेदवाराचा स्टेटस् लावणे, गावातील व्हॉटस् ॲप ग्रुपवर पॅनेल व उमेदवाराचा फोटो टाकणे, काही मराठी लोकगीतांचा आधार घेत आपल्या उमेदवाराचे समर्थन व स्थानिक आघाडीचा झेंडा घेऊन प्रचार केला जात आहे. ‘आता नाही, तर पुन्हा नाही’, ‘एकटा टायगर’, ‘आमचं ठरलंय’, ‘फिफ्टी फिफ्टी’ अशा शेलक्या विशेषणांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडत आहे.
हेही वाचा - दारूची तस्करी रोखण्यासाठी दोन गस्ती पथके
फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स ॲपद्वारे उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. असा स्वस्तात मस्त घरबसल्या प्रचार होत असून, त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. कोरोनामुळे निवडणूक प्रचारावर बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. तसेच प्रशासनानेही प्रचार पद्धतीवर अनेक निर्बंध घातले आहेत.
पूर्वी असंख्य कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन उमेदवार प्रचार करत होते; पण आता ठराविक कार्यकर्त्यांना घेऊनच उमेदवाराने प्रचार करावा, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, असे नियम घातले आहेत. त्यामुळे उमेदवारांचीही गोची झाली आहे. त्यामुळेच उमेदवारांचा सोशल मीडियावरून प्रचार वाढला आहे.
हेही वाचा - लग्न खर्चाला फाटा देऊन अनाथ मुलींना मदत
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.