जिल्ह्यात आल्यानंतर मायभूमीत जाण्यासाठी 'तिला करावा लागला' 23 तासांचा संघर्ष... 

Her '23-hour struggle to get to Mayabhumi
Her '23-hour struggle to get to Mayabhumi
Updated on

इचलकरंजी : स्वत:च्या जिल्ह्यात आल्यानंतर शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास त्या युवतीला तब्बल 23 तासांचा मनस्ताप सोसावा लागला. किणी नाक्‍यापासून इचलकरंजीत येण्यासाठी या युवतीचा 23 तासांचा संघर्ष अनेकांना संवेदनादायक ठरला. 

काल रात्रभर सीपीआरच्या प्रक्रियेत घालवलेली ही युवती आज पुन्हा येथील रुग्णालयाच्या नियमांच्या फेऱ्यातच अडकत अखेर आज दुपारी ती स्थिर झाली.  जिल्ह्यात आलेल्यांना मुळ गावी पाठविण्यासाठी प्रचंड हालअपेष्टा सहन करावी लागत आहे. रितसर परवाना असूनही औपचारिक बाबी पूर्ण करताना अशा अनेक नागरिकांना नेमके आपल्या मायभूमीत चाललो की अन्य कोठे? असाच अनुभव येत आहे.

 पुणे-बेंगलोर महार्गावरील किणी टोलनाका हा महत्त्वाचा पॉईंट ठरला आहे. ही युवती काल दुपारी चार वाजता किणी टोल नाक्‍यावर आल्यानंतर तिला 8 वाजता सीपीआरमध्ये पाठविले. तपासणीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या त्या युवतीला तब्बल 9 तासांच्या अवधीनंतर पहाटे पाच वाजता तपासणीसाठी आत घेतले. पुन्हा सीपीआरमधून इचलकरंजीकडे येताना आयजीएम रुग्णालयात रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. सीपीआरप्रमाणे आयजीएममध्येही लांबलचक रांगा लागल्या होत्या. त्या युवतीला आयजीएममधून गावभागातील नागरी आरोग्य अभियान केंद्रात नोंदणी करण्यास सांगण्यात आले.

तेथून पुन्हा तिला आयजीएममधून पत्र आणण्यास सांगितले. त्यानंतर तिला विलगीकरण कक्षात ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. यात गावभागातील नगरसेवकांनी लक्ष घातले आणि तब्बल 23 तासांनंतर त्या युवतीला आपल्या शहरात येता आले. नेमके आपण आपल्या मायभूमीत चाललो आहोत की अन्य कोठे अशीच अवस्था या युवतीची झाली. रितसर मार्गाने येण्यासाठी एकूणच जिल्ह्यात करावी लागलेली ही प्रक्रिया प्रशासनालाही विचार करावयास लावणारी आहे. 

रात्रभर रांगेतच 
दिवसभर प्रवास करून कोल्हापूरपर्यंत आलेल्या अनेकांना रात्रभर तपासणीसाठी रांगेत रहावे लागले. या ठिकाणी तब्बल 8 ते 10 तासांनंतर नंबर येत असल्याने थकून आलेल्या प्रवाशांची आणखीनच हेळसांड होत आहे. रितसर प्रक्रिया करताना सोसाव्या लागणाऱ्या अनेक यातना यानिमित्ताने पुढे आल्या आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.