कोल्हापूर :आज जातीपातीच्या नावावर ईर्षा होत असताना पुरोगामी विचार जपणार्या कोल्हापूर शहरात उच्चशिक्षित एक हिंदू मुलगा आणि उच्चशिक्षित मुस्लिम युवतीने विवाह केला. हा विवाह सर्वांच्या संमतीने आणि साक्षीने तसेच एकाच मंडपात मुस्लिम आणि हिंदू पद्धतीने सोहळा पार पडला. जिल्ह्याची अस्मिता दाखविणारे आणि राष्ट्रीय एकात्मता चे एक चांगले उदाहरण या दोघांनी आज समाजाला दाखवून दिले आहे.
कोल्हापुरात रंकाळा परिसरात राहणारे सत्यजित संजय यादव आणि मारशा नदीम मुजावर या दोघांच्यात लहानपणापासूनच मैत्री होती. ही निखळ मैत्री वाढतच गेली. भिन्न धर्म आणि घरातील कुटुंबातील व्यक्ती लग्नाला तयार होतील का ही भीती त्यांच्यात कायम होती. जे करायचे ते घरात वडीलधाऱ्या माणसांच्या संमतीनेच असाच निर्णय दोघांनी घेतला. दोन्ही कुटुंबे पुरोगामी विचाराचे आणि उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये सत्यजित आणि मार्शा यांनी घेतलेल्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही.
कोल्हापूर शहर पुरोगामी विचाराचे आहे आज या शहरात जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सण साजरे केले जातात .हिंदू धर्माच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य आज या ठिकाणी मुस्लिम समाजाकडून विकत घेतले जाते. मुजावर कुटुंबीय कोणताही धर्म भेद करत नाहीत. ईद बरोबरच दिवाळी, पाडवा यासह अनेक सण या कुटुंबांमध्ये साजरा होत असतात. दोन्ही घरांमध्ये चांगली मैत्रीचे ही वातावरण होते.त्यामुळे या दोघांच्या लग्नामुळे मैत्रीचे नाते अधिक घट होईल असा विश्वास दोन्ही कुटुंबीयांना वाटला.
शहरातील एका हॉटेलमध्ये मौलाना यांच्या उपस्थितीत मुस्लिम पद्धतीने निकाह झाला. तर त्याच वेळी हिंदू पद्धतीने अक्षता आणि सप्तपदी चा विधी झाला.
कोल्हापुरात शाहू महाराजांनी रुजवलेला एक वेगळा विचाराचा वारसा या निमित्ताने या ठिकाणी पहावयास मिळाला. एकाच मंडपात मंगलाष्टका आणि निकाह कबूल झाला.
" लहानपणापासून आमच्या दोघांच्यात मैत्री होती पळून जाऊन अथवा कुटुंबाला दगा देऊन लग्न करण्याचा विचार आमच्या डोक्यात सुद्धा आला नाही. कारण आम्हाला आमच्या कुटुंबाबद्दल खात्री होती. त्यामुळेच आम्ही आमचा निर्णय कुटुंबियांना सांगितला आणि त्यांनी तो मान्य केला" असे सत्यजित यांनी सांगितले.
माशाच्या कुटुंबियांचा एक वेगळा वारसा आहे त्यांचे आजोबा अस्लम मुजावर हे कोल्हापूर महानगरपालिकेत 1968 मध्ये नगरसेवक होते शेंडा पार्क येथे कुष्ठरोग्यांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी चिपको आंदोलन सुरू केले होते आणि त्याची राज्यभर चर्चा झाली होती. माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या या कुटुंबीयांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांचा आदर करण्याची शिकवण वडीलधाऱ्यांनी दिली आहे अशी प्रतिक्रिया मार्शा चे वडील नदीम मुजावर यांनी दिली.धर्म भेद न मानता आणि सर्व रीतिरिवाज पाळत राष्ट्रीय एकात्मतेचे एक चांगले दर्शन या विवाहाच्या निमित्ताने शाहूनगरीत पाहावयास मिळाले.
घरी लहानपणापासून वातावरण चांगले मिळाले. सगळे सण आम्ही साजरे करतो. त्यामुळे जात -धर्म हे कधी जाणवलेच नाही. जातीपाती न मानता पुरोगामी विचार अस्तित्वात आणायला हवा.
मारशा मुजावर यादव
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.