नागाव (कोल्हापूर) : इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार हाजी असलम सय्यद यांच्याविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलत्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दिली होती. मंगळवारी ( २८ जुलै ) रोजी या महिलेने शिरोली एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत अत्यंत गोपनीयता ठेवत माध्यमांपासूनही ही माहिती लपवली.
तक्रारदार महिलेने म्हटले आहे की,
हाजी असलम सय्यद आणि आपली एका क्कारंन्टाईल सेंटरमध्ये भेट झाली होती. त्याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्याशी संबंध ठेवले. पतीचे निधन झालेले असल्यामुळे मीही असलम वर विश्वास ठेवला असे या महिलेने सांगितले. नंतर मात्र त्याने जबाबदारी झटकली. यामुळे शिरोलीत राहणार्या या महिलेला धक्का बसला. आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. हाजी असलम याची यापूर्वी आणखीन चार लग्न झाल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी या महिलेने केली आहे.
दरम्यान हाजी असलम याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची कोठडी मिळाली आहे. हाजी असलम सय्यद याने २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून वंचित आघाडी कडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना चांगली मतेही मिळाली होती.
संपादन - अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.