मजुरीवाढीची अंमलबजावणी न झाल्यास इचलकरंजीत संघर्षाचा इशारा

In Ichalkaranji Warns Of Struggle If Wage Hike Is Not Implemented Kolhapur Marathi News
In Ichalkaranji Warns Of Struggle If Wage Hike Is Not Implemented Kolhapur Marathi News
Updated on

इचलकरंजी : सहायक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांसाठी जाहीर केल्याप्रमाणे 52 पिकास 8 पैसे मजुरीवाढीची उद्या (ता. 15)पासून अंमलबजावणी न केल्यास रस्त्यावर उतरून संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आज पत्रकार परिषदेत देण्यात आला. या वेळी भरमा कांबळे, शामराव कुलकर्णी, धोंडिबा कुंभार, हणमंत लोहार, राजू निकम, बंडोपंत सातपुते, आनंदा गुरव आदींनी मजुरीवाढीच्या प्रश्‍नासंदर्भात भूमिका मांडली. 

2013 मध्ये 42 दिवसांच्या आंदोलनानंतर मजुरीवाढीचा करार झाला. त्यानुसार 2018 पर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी मजुरीवाढ केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झाली नाही. केवळ यंत्रमाग उद्योगातील अस्थिर परिस्थितीमुळे कामगार संघटनांनी संघर्ष टाळला. जाहीर झालेली मजुरीवाढ न दिल्याने तीन वर्षांत कामगारांचे 92 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता जाहीर झालेली आठ पैसे मजुरीवाढ न दिल्यास 33 कोटी रुपयांवर कामगारांना पाणी सोडावे लागणार आहे. त्यासाठी आता संघर्षाची भूमिका घ्यावी लागत आहे, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले. 

जॉबर कामगारांना आठ वर्षे मजुरी वाढ नाही. यंत्रमाग कामगारांबरोबरच जॉबर, कांडीवाले, दिवाणजी, चेकर, मेंडर यांच्या मजुरीतही 10 टक्के वाढ झाली पाहिजे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या घटकांना उद्या (ता. 15)पासून मजुरीवाढ न झाल्यास कृती समिती रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे. यासाठी भागाभागात कामगारांच्या सभा घेतल्या जातील. त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. कामगार वर्ग उत्पन्न मिळवून देत असताना त्यांना मालक लुबाडत आहेत. सूत व्यापारी त्यांना लुबाडत असताना त्यांच्यासमोर मालक लोटांगण घालत आहेत, अशी टीकाही या वेळी मालकांच्या भूमिकेवर करण्यात आली. 

लोकप्रतिनिधींचीही भेट घेणार 
वाढती महागाई लक्षात घेता मजुरीवाढीची अंमलबजावणी होण्यासाठी कृती समिती कार्यरत राहणार आहे. यासाठी लवकरच लोकप्रतिनिधींचीही भेट घेण्यात येईल. त्यांनाही या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात आणून दिले जाणार असल्याचे कृती समितीकडून स्पष्ट करण्यात आले. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()