कोल्हापूर : जिल्हा बॅंक, राज्य बॅंकेवर कलम 88 ची कारवाई करत मला सहकारातून उठवण्याचा प्रयत्न केला. तसेच इन्कमटॅक्स, ईडीची कारवाई करुन मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्याचा आरोप, राज्याचे ग्रामिवकास मंत्री व जिल्ह्याचे नेते ना.हसन मुश्रीफ यांनी केला. ते जिल्हा बॅंकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. श्री.पाटील यांनी आपल्यावर केलेले चुकीचे आरोप मान्य करावेत अन्यथा त्यांच्यावर बदनामाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असेही ना.मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
ना.मुश्रीफ म्हणाले, भाजप सत्तेच्या काळात श्री.चंद्रकांतदादा यांनी खूप त्रास दिला. सहकार आणि राजकारणातून उठवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. जिल्हा बॅंकेची कलम 88 ची चौकशी लावून या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला. प्रादेशिक साखर संचालकांवर त्यांनी यासाठी दबावही आणला. विरोधक म्हणून आयुष्यातून उठवण्यासाठी पुर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश आणून कायदा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईडी, इन्कमॅटक्सच्या माध्यमातून कारवाई केली. हे कमी होते की काय म्हणून आमच्या ग्रामिवकास विभागाने अर्सेनिक अल्बम हे औषध राज्यातील 5 कोटी जनतेला देण्याचा निर्णय घेतला. यामध्यही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. वास्तविक औषध खरेदीचा अधिकार हा जिल्ह्याला देण्यात आला आहे, असे असताना चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.
अर्सेनिक अल्बमच्या आरोपानंतर मी त्यांना माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांनी माफी न मागितल्याने बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर सतत पत्रकबाजी झाली. या सर्व प्रकारावर मी आता पडदा टाकणार आहे. श्री.चंद्रकांतदादा यांनी 'झालेल्या गोष्टी चुकून झाल्या, गैरसमजातून झाल्या, राजकीय हेतून झाल्या, माहिती न घेता बोलल्याने झाल्या' हे एकदा कबूल करावे. याबाबत त्यांनी पुन्हा एकदा फेरविचार विचार करावा. त्यातूनही जर त्यांनी या चुका मान्य केल्या नाहीतर आपणाला बदनामीचा फौजदारी गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा ना.मुश्रीफ यांनी यावेळी दिला.
हातात हात घालून काम करुया
आज आपल्यावर कोरोनाचे संकट आले आहे. मुबंईएवढी रुग्णसंख्या आपल्याकडे सापडत आहे. अशा काळात टीकटिप्पणी, आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हातात हात घालून काम करुया,असे आवाहनही ना.मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना केले आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.