Gram Panchayat Results : चंद्रकांत पाटीलांना खानापूरात धक्का ; ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच झेंडा

Khanapur kolhapur Gram Panchayat Results chandrkant patil village political news
Khanapur kolhapur Gram Panchayat Results chandrkant patil village political news
Updated on

 गारगोटी (कोल्हापूर)  : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावी  आमदार प्रकाश आबिटकर यांच्या आघाडीने ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविला. तर चंद्रकांत पाटील यांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. माजी मंत्री पाटील व आमदार आबिटकर यांनी निवडणुकीत लक्ष घातल्याने अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती.  

 पहिल्या दोन प्रभागात शिवसेना आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार विजयी झाले. तर तिसऱ्या प्रभागात भाजपच्या महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. ६ जागा जिंकून आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्तांतर घडविले.  शिवसेनेच्या रांगणा माऊली आघाडीचे नेतृत्व बाळासाहेब भोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे यांनी तर विरोधी तळेमाऊली महाविकास आघाडीचे नेतृत्व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, राष्ट्रवादीचे संजय रेडेकर, काॅंग्रसचे भुजंगराव मगदूम यांनी नेतृत्व केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर गावासाठी भरीव विकास निधी दिला होता. त्यांच्या निर्णयानुसार  गतनिवडणूक बिनविरोध झाली होती. 

मात्र यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीने झाली. कारण  राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा शेतकरी संघाचे संचालक बी. डी. भोपळे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला होता. त्यांच्या आघाडीविरोधात माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसने महाविकास आघाडी केल्याने मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या होत्या. शेवटपर्यंत येथे अटीतटीचा सामना रंगला होता. तर चुरशीने मतदान नोंद झाले होते. यामुळे ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.