कळंबा कारागृहात आता "असूर'चा पहारा 

kolhapur kalamba jail asur dogs
kolhapur kalamba jail asur dogs
Updated on

कोल्हापूर - कळंबा कारागृहाच्या सुरक्षीततेसाठी "असूर' या श्‍वानाचा आता 24 तास पहारा राहणार आहे. मोबाईलसह गैरप्रकार रोखण्यासाठी या श्‍वासनची मदत घेतली जाणार आहे. 

कळंबा कारागृहात घडलेल्या मोबाईल प्रकरणापाठोपाठ झडतीत पुन्हा दोन मोबाईल सापडले. कारागृहाच्या सुरक्षीततेसाठी अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी आक्रमक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. ते लंडन येथे अभ्यासासाठी गेले होते. तेथील कारागृहात सुरक्षेसाठी श्‍वानाची मदत घेतली जाते.

हे श्‍वान कारागृहातील अमंली पदार्थ, मोबाईल व हत्यारे शोधून काढण्यास मदत करतात. अशाच पद्धतीने श्‍वानाच्या मदतीने कळंबा कारागृहाची सुरक्षीतता भक्कम करण्यासाठी इंदूरकर यांनी पुढाकार घेतला. फलटण येथून आणलेला "असूर' नावाचा श्‍वान कारागृहात आज दाखल झाला. तो 18 महिन्यांचा आहे. कारागृहात मोबाईल फेकण्यासह इतर कोणताही गैर प्रकार घडू नये जर घडला तर तो तातडीने निदर्शनास यावा आणि संबधितावर तातडीने कारवाई करता यावी यासाठी या श्‍वानाची मदत प्रशासन घेणार आहे. या श्‍वासनाचा 24 तास कारागृह परिसरात पहारा राहणार आहे. 


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.