गतनिवडणुकीत सर्वसाधारण प्रभागात भाजपची सरशी

kolhapur municipal corporation election 2020
kolhapur municipal corporation election 2020
Updated on

कोल्हापूर - महापालिकेच्या गत निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीने सर्वसाधारण तसेच महिला (सर्वसाधारण) प्रभागात सर्वाधिक 19 जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत याच प्रभागांवर या आघाडीचे लक्ष्य राहील. कॉंग्रेसने स्वबळावर आठ जागांवर विजय संपादन केला होता. येत्या निवडणुकीत हेच समीकरण कायम राहते की बदलते, का कॉंग्रेस-राष्ट्रवादी चमत्कार करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

गेल्या निवडणुकीत सर्वसाधारण गटासाठी 24 जागा होत्या. भाजप-ताराराणी आघाडी, तसेच कॉंग्रेसने प्रत्येकी आठ राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाच, शिवसेनेने एक, अपक्षांनी दोन जागांवर विजय मिळविला होता. गतवेळी राज्यात भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता होती. 

2014 च्या निवडणुकीत सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे कॉंगेस एकाकी होती, कॉंग्रेस 27 जागांवर विजयी झाली होती. पैकी आठ सर्वसाधारण गटातून सहा महिला (सर्वसाधारण) गटातून सहा, ओबीसी (पुरुष) गटातून तीन. महिलातून चार, अनुसूचित दोन, महिलातून चार अशा 27 जागांवर कॉंग्रेस विजयी झाली. सर्वसाधारण तसेच महिला (सर्वसाधारण) गटातून भाजप-ताराराणी आघाडीने 19 जागांवर विजय मिळविला होता. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी, तसेच शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असली तरी भाजप-ताराराणीचे वर्चस्व असलेल्या सर्वसाधारण गटात तिन्ही पक्ष अधिक लक्ष केंद्रित करतील. केंद्रात तसेच राज्यातील सत्तेमुळे भाजप गेल्या निवडणुकीत फॉर्मात होती. यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. पॅनेल पद्धत तसेच थेट लोकांतून महापौर निवडीची पद्धत अस्तित्वात आणली. महाविकास आघाडीने पद्धत रद्द करून प्रभागनिहाय निवडणुकीवरच शिक्कामोर्तब केले. गत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वसाधारणमधून पाच, महिला गटातून सहा, ओबीसीतून दोन, महिलातून दोन जागांवर विजय मिळविला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या एकाही गटातून राष्ट्रवादीला विजय मिळाला नाही. येत्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे 11 प्रभाग बदलणार आहेत. शिवसेनेची गेल्या निवडणुकीत अवस्था वाईट होती. 41 प्लस जागा जिंकण्याचा संकल्प केलेल्या शिवसेनेला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. सर्वसाधारणमधून एक, ओबीसी (पुरुष) गटातून एक, महिला गटातून एक. अनुसूचित जाती (पुरुष) गटातून एका जागेवर विजय मिळविला होता. 

 
पक्षीय निवडणुकीला यश 
महापालिकेत सत्तेसाठी घोडेबाजार होऊ नये, यासाठी निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेली. त्यास गतनिवडणुकीत यश मिळाले. अपक्ष उमेदवार तीन जागांवर विजयी झाले. यातील दोघे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तर एकजण भाजप ताराराणी आघाडीच्या पाठीशी राहिला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.