कोल्हापूर : नात्यातील माणसांच्या गोतावळ्यात सर्वांच्याआशीर्वादाने होणाऱ्या लग्नसोहळ्यांचे समीकरण सध्याच्या परिस्थितीमुळे बदलले आहे. मात्र, प्रत्येकाच्या आयुष्यात विवाहसोहळा हा नेहमीसाठी स्मरणात राहणारा असावा अशी इच्छा असते. लॉकडाउन आणि सोशल डिस्टन्सच्या काळात असे नेहमी स्मरणात राहणारे विवाह सोहळे संपन्न करण्यासाठीच म्हणून ट्रिपल फिफ्टीचा नवीन फॉर्मुला वापरला जात आहे.
कोरोनाचे संकट गडद होत गेले आणि सर्वच गोष्टींवर बंधने येऊ लागली. विशेषतः समुदाय एकत्रित येणाऱ्या ठिकाणावर याचा सर्वाधिक परिणाम झाला. थाटात विवाह करण्याचे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहिले. यातही शासनाच्या दिलासादायक निर्णयामुळे विवाह सोहळ्याना मंजुरी मिळाली आणि पन्नास माणसांच्या उपस्थितीत हे विवाह करण्याबाबत सूचनाही करण्यात आल्या.
ट्रिपल फिफ्टीचा रुजतोय ट्रेंड
मात्र, पै- पाहुणे आणि गोतावळा मोठा असणाऱ्यांसमोर नेमके पन्नास पाहुणे कोण? असा प्रश्न उपस्थित झाला. यावर इव्हेंट प्लॅनर्सनी शक्कल लढवत ट्रिपल फिफ्टी आणि लोकेशन वेडिंगचा अवलंब केला आहे. नेहमी लक्षात राहील असा स्वरूपाच्या संपूर्ण विवाह सोहळ्याचे आयोजन सध्या इव्हेन्ट प्लॅनर्सकडून करण्यात येत आहे. अगदी छोट्यातील छोट्या बाबींचा विचार करून हे प्लॅनिंग करण्यात येत असल्यामुळे कमी माणसात आणि कमी खर्चात अधिक चांगले विवाह सोहळे पार पडत आहेत. यामध्ये हळद समारंभापासून लग्न आणि रिसेप्शनपर्यंतचे प्लॅनिंग केले जात आहे.
इव्हेंट प्लॅनर्सनी लढवली वेगळी शक्कल
शासनाने जरी केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करत लोकेशन वेडींगची रचना या इव्हेन्ट प्लॅनर्सकडून केली जात आहे. यामध्ये उपस्थितांमध्ये योग्य तितके सामाजिक अंतर राखण्यासाठीचे निकष पाळूनच सजावट आणि मांडणी करण्यात येत आहे. बैठक व्यवस्थेच्या अंतरापासून ते आशीर्वाद देण्यासाठीच्या स्टेजपर्यंतची काळजी घेतली जात आहे. वधू- वराला लागणारे हार-तुरेही योग्य पद्धतीने निर्जंतुकीकरण करूनच वापरण्याची व्यवस्था केली जात आहे. येणारे उपहार स्वीकारणे शिवाय त्याची योग्य नोंद ठेवण्याची जबादारी आता या इव्हेन्ट प्लॅंनिंगचा भाग झाले आहे. अशा छोट्या मोठ्या नोंदींमुळे संभाव्य विषाणू प्रसाराचा धोका आणि विशेषतः संसर्ग फैलावाची कडी आरोग्य यंत्रणेला समजणे सहज सोपे होत आहे.
ट्रिपल फिफ्टीच्या फॉर्मुल्यामुळे एका वेळी अनेकांची गर्दी टाळणे शक्य होत आहे. यामुळे समाजातील प्रतिष्ठा आणि नाती- गोती सांभाळणेही शक्य झालेआहे. शिवाय नियमावलीसह आरोग्याच्या काळजीमुळे आरोग्यदायक विवाहसोहळे संपन्न होण्यास मदतच होत आहे.
पारंपरिक विवाहामध्ये येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता कमी बजेटमध्ये अधिक आकर्षक आणि आरोग्यवर्धक सोहळे करावे लागणार आहेत. इव्हेंट प्लॅन करताना बजेट काहीही असो मात्र खात्रीशीर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्थाही आमच्याकडून केली जात आहे.
-कैवल्या घाटगे, अन्वी इव्हेंट्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.