सैन्यदलात अधिकारीच होण्याची स्वप्ने मराठा तरुणांनी पहायला हवीत

 Maratha youth should dream of becoming officers in the army
Maratha youth should dream of becoming officers in the army
Updated on

कोल्हापूर ः भारतीय सैन्यदलाचा विचार केला तर शिपाई किंवा समकक्ष पदावर हजारो मराठी तरुण आहेत. मात्र, ऑफिसर्स केडरमध्ये ते अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहे. त्यामुळे आता सैन्यदलात करिअर करायचे तर अधिकारी म्हणूनच, असा संकल्प मराठी तरुणांनी केला पाहिजे, असे आवाहन आज औरंगाबादच्या एमजीएम स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक, लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी केले. 
कोरोना महामारीच्या संकट काळात येणारे शैक्षणिक वर्ष कसे असेल, याबाबत सध्या संभ्रमावस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी वंदे एज्युकेशन फाउंडेशन, शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था (राशिवडे बुद्रुक) यांच्यातर्फे दोनदिवसीय "बारावीनंतर पुढे काय? करिअर वेध' या विनामूल्य ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन झाले. त्याचे दुसरे पुष्प आज डॉ. ढगे यांनी गुंफले. "सकाळ' या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. 
"बारावीनंतर सैन्यदलातील सुवर्णसंधी' या विषयावर डॉ. ढगे यांनी संवाद साधला. त्यांनी भारतीय सैन्य दल आरोग्य विभागात उपसंचालकपद भूषविले असून गेली 20 वर्षे मराठी तरुणांचा सैन्यदलातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सैन्यदलातील नेमकी रचना कशी असते, ऑफिसर्स केडर म्हणजे काय, निवड प्रक्रिया कशी असते इथपासून ते तयारी कशी करावी, अशा विविध अंगांनी त्यांनी संवाद साधला. प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांच्या शंकांना त्यांनी उत्तरेही दिली. होण्याची स्वप्ने मराठा तरुणांनी पहायला हवीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.