लग्न 50 लोकांत, ना रूसवा-फुगवा, ना अवाढव्य खर्च 

Marriage in 50 people, no fuss, no huge expenses
Marriage in 50 people, no fuss, no huge expenses
Updated on

कोल्हापूर : लग्न म्हणजे अवाढव्य खर्च, पै-पाहुण्यांचा रूसवा-फुगवा काढण्यात खिशाला कात्री. वरातीत आतषबाजी अन मित्र-मंडळींच्या खर्चासाठी हातावर ठेवलेली पाकिटे. त्यातही उच्च वर्गियांचा 25 ते 30 लाख, मध्यमवर्गीयांचा 10 ते 15 लाख, तर होतकरू कुटुंबीयांचा एक लाख असा खर्चाचा अंदाज. एखाद्या लग्न सोहळ्यातील हे नेहमीचे चित्र. 

कोरोनाच्या दणक्‍याने हा खर्च मात्र आटोक्‍यात आलाय. लग्न सोहळ्याचे आर्थिक समीकरणच बदलून टाकले आहे. 

लग्न ठरलं की, हॉलचे बुकिंग केले जाते. जेवणासाठी आचाऱ्याला ऍडव्हान्स दिली जाते. जथ्थ्यासाठी दुकानांची वारी सुरू होते. वरातीसाठी मोठ्या आवाजाची ध्वनी यंत्रणा ठरवली जाते. खर्च करताना वधू-वर पक्षाच्या कुटुंबीयांची दमछाक होते. ऐपत नसताना शेजाऱ्याच्या इर्षेवर थाटामाटातील लग्नासाठी कर्जाच्या बॅंकांच्या पायऱ्याही झिजवल्या जातात. 

कोरोनाने हे चित्र बदलून टाकलंय. त्यामुळे जथ्थ्याचा खर्च कमी तर झालाच, शिवाय जेवणावळीच्या खर्चालाही ब्रेक लागलाय. मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीतल्या लग्न सोहळ्याने वधू-वर पक्षाकडील कुटुंबीयांची खर्चाची काळजी कमी झाली आहे. 

शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियम पालन करुन 50 लोकांच्या सहभागाने लग्न कार्य करता येईल . 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी. 

माझ्या मुलीचे लग्न झाले. तिच्या लग्नातल्या खर्चाची चिंता पूर्वी होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लग्नात होणारा तीन ते चार लाखांचा खर्च टाळता आला. प्रत्येक कुटुंबीयाने मुला-मुलीच्या लग्नात खर्च कमी करून त्यांच्या भविष्याची तरतूद करावी. 
- प्रकाश चौगले 

दृष्टीक्षेपात 
* जिल्ह्यात एकूण मंगल कार्यालये -150 
* कॅटरर्स- 3000 
*आचारी आणि वाढपी- 10,000 
*एकुण ब्रासबॅन्ड - 50 
.*बॅंडवाले -200 
* डोली घोडेवाले- 150 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.