कोल्हापूरच्या पोरीचा नाद खुळा!  १९ व्या वर्षी टुव्हीलर दुरुस्तीतीतून आत्मनिर्भरतेकडे 'तीचे' एक पाऊल

Mechanical and Vehicle Repair shiwani bhople story by snehal kadam
Mechanical and Vehicle Repair shiwani bhople story by snehal kadam
Updated on

कोल्हापूर : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेऊन स्वत:चे करिअर घडवणाऱ्या अनेक मुली आज समाजात आहेत. या क्षेत्रात आज वेगवेगळे कोर्स उपलब्ध आहेत. बहुसंख्य तरुणांचा याकडे ओढा आहे. मात्र निव्वळ आवड आणि जिद्दीच्या जोरावर मेकॅनिकल आणि व्हेईकल दुरुस्ती करत कोल्हापुरच्या शिवानी भोपळेने आत्मनिर्भतेकडे एक पाऊल टाकले आहे. 


काहीतरी वेगळं करावं, शिकावं स्वत:च्या पायावर उभं रहावं या हेतुने वयाच्या १९ व्या वर्षीच मुलांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाय रोवून उभारण्यास सुरुवात केली आहे.शिवानी मुळची कोल्हापुरची रहिवासी. कोणतही टेक्निकल बॅग्रांउड नसताना केवळ आवड आणि वेगळ काहीतरी करण्याच्या कुणकुण तिली इथंवर घेऊन आली. १० वी नंतर तिने कोल्हापुरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आणि तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. ३० मुलांमध्ये कोर्ससाठी प्रवेश घेणारी ती एकमेव मुलगी असल्याचे ती सांगते. 

सहा महिन्यानंतर तिने प्रशिक्षणार्थी म्हणून एक ठिकाणी काम करायला सुरुवात केली. ऑईल बदली, फिल्टर काढणे, कार्बोरेट चेक करणे, जनरल चेकअप, इंडिकेटर चेकअप, स्पीड मीटर, चेन टाइट करणे अशी सर्व कामात आज ती तरबेज झाली आहे. प्रॅक्टीस म्हणूम रुजु झालेली शिवानी दीड वर्ष झालं तिथेच सुनील दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली  शिकत आहे. यामध्ये इंजिन जोडणे हे आव्हानाच काम असतं पण मी अजुन ते शिकत आहे असे शिवानीने सांगितले. 


मला अनेकांनी हे क्षेत्र मुलींच आहे का? तु कशी काय हे काम करु शकते ? याबद्दल बरचं काही सांगितले आहे. मात्र घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आज आवडत्या क्षेत्रात आनंदाने काम करत असल्याचे तिने सांगितले. आज बऱ्याच वेगवेगळ्या  क्षेत्रात मुली काम करत आहेत. मात्र या क्षेत्राकडे त्यांचा कल कमी आहे. मात्र माझी आवड असल्याने इकडे वळले आहे. या क्षेत्राकडे मुलींचा कल वाढयला हवा. आज मार्केटमध्येही जॉबची शाश्वती नाही. अशावेळी वेगळं काम, वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी थोड आगळ वेगळ करणे ही काळाची गरज बनली आहे. या क्षेत्राकडे फक्त मुलांचे क्षेत्र आहे आणि आम्ही मुली हे कसं करु असा न्युनगंड न ठेवता एक आव्हान म्हणून पाहिले पाहिजे. 

 - "नवी काहीतरी शिकण्याच्या उद्दिष्टे मनाशी बाळगून या क्षेत्राकडे वळले. यात मला माझ्या घरच्यांनी पाठिंबा दिला. या क्षेत्रात कामाची सुरुवात दीड वर्षापूर्वीपासून झाली आहे. अजुन खुप काही शिकायचे बाकी आहे. येत्या काही दिवसांत ते सगळं शिकायचं आहे. भविष्यात याच क्षेत्रात नविन काहीतरी शिकून  
आत्मनिर्भर होणार आहे."
 शिवानी भोपळे

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()