कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात प्रचंड मताधिक्याने निवडूण आलेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव घेवून गालबोट लावणार नाही, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. तर, पदवीधरनंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुका जिकंणार म्हणणाऱ्यांना लोकशाहीने त्यांची जागा दाखवून दिल्याची टीका गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज केली.
पुणे पदवीधर मतदार संघाचे विजयी झालेले पदवीधर आमदार अरुण लाड आणि शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याहस्ते येथील महासैनिक दराबार हॉलमध्ये जाहीर सत्कार झाला. यावेळी ते बोलत होते.
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. आशा लोकांना भुईसपाट केलं पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना मी सांगितले होते ही सत्तेची सूज आहे. सुजीसाठी लोक येत असतात. पैसे उधळून लोक जवळ येत नाहीत. मात्र लोकांची आयुष्यभर सेवा करावी लागते.
जिवाभावाच्या माणसांमुळे महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. पण, आजचा सत्काराचा चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील यांचे नाव घेवून त्याला गालबोट लावणार नसल्याचेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, पहिल्या फेरीतचे निवडून येणार म्हणत ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची निवडणूकही जिकंणार म्हणणाऱ्यांना लोकशाही काय आहे? लोकांची ताकद काय आहे, हे समजले असेल. पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून दिले. खासदार धैर्यशील माने असते तर राजाराम कारखाना हातात असता. भविष्यातल्या निवडणुकाही आपण एकत्र लढविणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, विरोधकांना सुरुंग लावण्याचे काम या कोल्हापुरातून झाले आहे. महाविकास आघाडीची ही कामगिरी राज्यात उत्कृष्ट आहे.
हे पण वाचा - शिवसैनिकांनो हीच वेळ यांना खाली खेचण्याची
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील या दोघांची ही निवडणूक असल्याचे मानून कार्यकर्त्यांनी जीवाचे रानं केले आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेतही अशीच एक्ये दाखविण्याचा निर्धार माने यांनी केला. खासदार प्रा संजय मंडलिक म्हणाले, गेल्या अनेक निवडणुका चंद्रकांत पाटील यांच्यामागेच आम्ही होतो. आता आम्ही त्यांच्या मागे न थांबवल्यावर काय होते हे त्यांना कळले आहे.
संपादन - धनाजी सुर्वे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.