खासदार मंडलिक यांच्या कार्यकर्त्याचा या नंबरासाठी आहे आग्रह

MP Mandlik's activist insists for this number
MP Mandlik's activist insists for this number
Updated on

माजी खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक जिल्ह्याच्या राजकारणातील वेगळं रसायन. मुरगूडच्या मातीतला त्यांचा जन्म. भरदार शरीरयष्टी, फर्डा आवाज व रोखठोक स्वभाव ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. जनसमूहात या वैशिष्ट्यांचा बोलबाला होता. सामान्य कार्यकर्ता मंत्री होऊ शकतो, याचा त्यांनी धडा घालून दिला. ते 1985 ला कागल विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. प्रवासासाठी लोकवर्गणीतून त्यांना जीप भेट देण्यात आली. तिचा नंबर 9999 होता. तो विजयाची खात्री देणारा नंबर, असा मतदारांचा विश्वास होता. प्रा. संजय मंडलिक यांनी वडिलांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालवताना या नंबरवरील श्रद्धा ढळू दिली नाही. कोल्हापूर जिल्हा लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत. त्यांच्या घरातील गाड्यांच्या क्रमांकात नऊ अंकाला विशेष महत्व आहे. 


माजी खासदार मंडलिक शेतकरी कुटुंबातले. राजाराम महाविद्यालयाचे ते विद्यार्थी सचिव होते. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयात त्यांचा सखोल अभ्यास होता. सामान्य कार्यकर्ता राजकारणाची नस ओळखू शकतो, याचा प्रत्यय त्यांनी स्वकर्तृत्वातून दिला. कागलची 1985 ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरली. विजयाचा गुलाल त्यांच्यावर उधळला गेला. लोकवर्गणीतून जीपची अनमोल भेट त्यांना मिळाली. जीपचा नंबर 9999 होता. मंडलिक कुटुंबासाठी तो लकी ठरला. मंडलिक पुन्हा 1990 व 1995 ला आमदार झाले. पुढे त्यांच्या राजकारणाचा परीघ वाढला. कोल्हापुरातील जिल्ह्यातील गावांगावात त्यांचा संपर्क सुरु झाला. जिल्ह्याच्या सत्तेची सूत्रे खासदारकीतून त्यांना मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून ते खासदार झाले. सलग चार वेळा खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. 

मंडलिकांच्या राजकीय कारकिर्दीत नव्या गाड्यांची खरेदी झाली. त्या खरेदी करत असताना 9999 क्रमांकावर जोर देण्यात आला. अपवादात्मक स्थितीत अन्य नंबर गाड्यांना घेण्यात आले. ते घेत असताना 9 अंक नंबरप्लेटवर येईल, यावर कटाक्ष ठेवण्यात आला. प्रा. मंडलिक यांनी यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. तेही ग्रामीण भागातील समस्या जाणून घेत राजकारणात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. राजकारणातील चढ-उताराचा अनुभव त्यांना आला. गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर त्यांनी पुन्हा नशीब आजमावले. त्यांच्या संपत्ती विवरणपत्रात तीन गाड्यांची नोंद होती. 

डस्टर एम एच 09-सीजे 9999, ×क्‍टिव्हा एम एच 09 बीटी 999, यामाहा एम एच 09 सीपी 9999 असे गाड्यांचे नंबर त्यात ठळकपणे समोर आले. मंडलिक कुटुंबीय व 9999 नंबर मतदारांच्या डोक्‍यात कोरला गेला. मुलगा वीरेंद्र, यशोवर्धन व समरजित यांनी प्रचारात कसूर केली नाही. प्रा. मंडलिक यांनी निवडणुकीत बाजी मारली. जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करत असताना त्यांचा जनसंपर्क तुटलेला नाही. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली. उपचार घेऊन ते घरीच विश्रांती घेत आहेत. परिणामी त्यांच्या 9999 गाड्यांची चाकेही घराच्या अंगणात थांबून आहेत. ते म्हणाले, "लोकांच्या आग्रहास्तव 9999 नंबर गाड्यांना घेतला जातो. लोकांची या नंबरवर श्रद्धा आहे. हा नंबर मंडलिक कुटुंबासाठी लकी ठरतोय, असा त्यांना विश्‍वास आहे.''

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.