कोल्हापूर - करोना व्हायरसमुळे सर्व देशांनी सतर्कता बाळगल्याने याचा फटका परदेशी पर्यटन करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेला असून कोल्हापूर जिल्हा व परिसरातील सुमारे 44 पर्यटक इराक आणि इराण परिसरात धार्मिक तीर्थक्षेत्राला गेले असता तेहरान येथे अडकून पडले आहेत. या सर्वांच्या सुटकेसाठी खासदार संजय मंडलिक यांनी तातडीने परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधून या सर्वांची लवकरात लवकर तेहरान येथून सुटका व्हावी अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा - ...तर कोल्हापुरमधील या भागातील पाणीपुरवठा होणार बंद
याबाबत अधिक बोलताना खा. मंडलिक म्हणाले, इराण आणि इराकमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक धार्मिक यात्रेकरीता जात असतात. यावर्षी कोल्हापूर व परिसरातून सुमारे 44 पर्यटक धार्मीक तीर्थेक्षेत्रासाठी तेहरानला गेले. परंतू जगात सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या भितीने विमानांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातल्याने तेहरानमध्ये सर्व भाविक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेकरीता परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. कोल्हापूर व परिसरातील हे सर्व भाविक वयस्कर असून त्यांकडील औषधे व तत्सम साहित्य संपत आले आहेत. त्यांचे नातेवाईक सर्व प्रवाशांच्या सुरक्षित परत येणेच्या चिंतेमुळे त्रस्त झाले असून त्यांना लवकरात लवकर भारतात पाठवावे अशी मागणी खा. मंडलिक यांनी केली असून याबाबत लवकरच कार्यवाही करत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.