रुग्णांचे नाव एक अन्‌ पत्ता दुसरा 

The name of the patient is one and the address is another
The name of the patient is one and the address is another
Updated on

कोल्हापूर : मुंबई, पुणे, सोलापूरसह इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या लोकांची कोरोना तपासणी चाचणी केली जाते; मात्र या तपासणीत एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला शोधण्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पोलिसांची फौजच्या फौज कामाला लागते. पण संबंधिताचे नाव एक असते, गाव एक आणि तालुका दुसराच लिहिलेला असतो.

यामुळे सीपीआरकडून कोरोनाबाधित रुग्णांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यादीत दिलेल्या चुकीच्या नाव व गावामुळे संबंधित गावातील लोकांना रात्र-रात्र जागून अशा लोकांचा शोध घ्यावा लागत आहे; पण प्रत्यक्ष नाव आणि गाव दुसरेच असते. त्यामुळे संपूर्ण गावाला भीतीच्या छायेत राहावे लागत आहे. 

शासकीय यादीमध्ये नावात, गावात आणि तालुक्‍यात बदल झाल्यामुळे शिंगणापूर येथील बटुकेश्‍वर कॉलनी, रुई (ता. हातकणंगले), कडलगे (ता. गडहिंग्लज), कळंबा तर्फे ठाणे (ता. करवीर) मधील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची नावे, पत्ता, मोबाईल क्रमांकाची नोंद करताना काळजीपूर्वक करावी लागणार आहे. तुम्ही घरी आहे का? तुमचा पत्ता हाच आहे का? तुमचा पत्ता हाच असेल तर तुमचा मुलगा, मुलगी किंवा घरच्या व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे, त्याचा रिपोर्ट आताच आला आहे. तुम्ही घरीच थांबा, आम्ही त्याला घ्यायला येतोय, असं म्हणून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांना फोन केला जातो.

त्यानंतर त्या घरात, गावात आणि परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. लोक जमा होतात आणि शासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी येतात त्यावेळी त्यांना कळते, की कोरोना रुग्ण दुसऱ्याच तालुक्‍यातील आणि गावातील आहे. त्यानंतर मूळ ज्याला कोरोना झाला आहे, त्या व्यक्तीचा शोध घेणे तेथून सुरू होते. यामध्ये ज्यांना कोरोना झालेला नाही किंवा जे क्वारंटाईन आहेत; पण केवळ नावामध्ये साम्य असल्याने त्या व्यक्तीसह लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 
 

यादीत नावे आलेली गावे 
बटुकेश्‍वर कॉलनी (शिंगणापूर, ता. करवीर), रुई (ता. हातकणंगले), कडलगे (ता. गडहिंग्लज), कळंबा तर्फ ठाणे (करवीर) अशा अनेक गावांमध्ये मोठी चूक झाली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.