डोपिंगच्या पकडीत सापडलेत कुस्तीपटू ; झपपट यशाच्या मोहात स्टेरॉइड्सचे सेवन

the problem of doping in wrestling players stove in kolhapur
the problem of doping in wrestling players stove in kolhapur
Updated on

कोल्हापूर : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे नुकतेच निधन झाले. खंचनाळेंच्या कुस्ती कारकिर्दीत ते घेत असलेल्या खुराकाची यानिमित्ताने महाराष्ट्रभर चर्चा घडली. कै. खंचनाळे दिवसाला दोन किलो मटण, एकावेळी एक लिटर बदामाची थंडाई, किलोभर तूप असा त्यांचा आहार ऐकूनच अनेकजण थक्क झाले. जुन्या पैलवानांत हा खुराक पचवण्याची ताकद होती. तितका सराव, अंगमेहनत ते करत होते. त्याच्या ताकदीचे, बलदंड शरीरामागचे देशी आहार असे हे रहस्य होते.

अलीकडच्या दशकात कुस्ती क्षेत्रात डोपिंग घेणारी अपप्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. मोठ्या जोडीतल्या पैलवानांना याची चटक लागली आणि त्याचा फैलाव वाढत गेला आणि या रांगड्या खेळाला काही जणांकडून गालबोट लागले आहे.

सुरवातीला मोठ्या स्पर्धांत चांगली कामगिरी दाखवता यावी, यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैलवानांना याची सवय झाली आणि अगदी छोट्या स्पर्धेवेळी, रोजच्या सरावावेळीही इंजेक्‍शन, गोळ्याचा रतीबच पैलवानांनी लावून घेतला. एका प्रकारच्या नशेची सवयच त्यांना जडली. उत्तेजक द्रव्यांच्या इंजेक्‍शनाच्या शेकडो सुळ्या अंगावर टोचून घेण्याची सवयच मल्लांना लागली आहे.

अगदी शालेय स्पर्धेपासून मानाच्या महाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय स्पर्धेवेळी ही मल्लांच्या डोपिंगची अनेक प्रकरणे समोर आली; परंतु प्रशिक्षक, कुस्ती संघटना, तालीम संघ या विखारी प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याने हा धोका वाढत आहे. पैलवानांना याच्या तोट्यांना सामोरे जावे लागते. खेळाडूंच्या शरीरावर दुष्परिणामही झाले आहेत, तर अनेकांची कुस्ती संपुष्टात येत आहे.

खेळाडू अशा शोधतात क्‍लृप्त्या 

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्था (नाडा) ही वेगवेगळ्या स्पर्धेवेळी खेळाडूंच्या रक्ताचे नुमने घेत डोपिंग चाचणी करते, परंतु या चाचणीतून कसे निसटायचे, याच्या क्‍लृप्त्या  खेळाडूंनी शोधल्या आहेत. स्पर्धेच्या निवासी प्रशिक्षण शिबिरांना गैरहजर राहणे. स्पर्धा संपल्यानंतर रक्त नमुने घेतले जातात. म्हणून बक्षीस समारंभ होण्याआधीच गायब होण्याचे प्रकार खेळाडू करतात.
 

डोपिंग घेण्याचा अपप्रचार 

  •   इंजेक्‍शन घेतल्याने दम वाढतो 
  •   शरीर दणकट होते, ताकद येते 
  •   आपला सहकारी घेतो, आपण का नाही  घ्यायचे.
  •   इंजेक्‍शन घेतल्याने स्पर्धेत यश मिळतेच ही  मानसिकता

"स्पर्धेवेळी डोपिंग चाचणी केली तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जास्त खेळाडू पोहचवू. चाचणी झाल्याशिवाय खेळाडूंना मेडल देऊ नये. फक्त डोपिंग विषयासाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने एक वेगळा विभाग सुरू करावा. पैलवानांना डोपिंगपासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे."

- दत्तात्रय जाधव-सोंडोलीकर, कुस्ती संघटक

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()