कोल्हापूर (कोडोली) : वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे देवदर्शनासाठी आलेल्या इस्लामपूर येथील महिलेच्या पर्समधील १६ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १५ हजार असे आठ लाखांचा ऐवज चोरट्याने पळविला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी इस्लामपुरातील आर.आय.टी. कॉलनी येथील हेमलता अधिकराव पाटील या कुटुंबासमवेत रविवारी जोतिबा दर्शनासाठी आल्या होत्या. रविवार असल्याने दर्शनासाठी भाविकांची जोतिबा डोंगरावरत मोठी गर्दी झाली होती.
हेमलता पाटील या काळ भैरव देवाचे दर्शन घेत असताना त्यांनी आपल्या गळ्यामध्ये अडकवलेल्या पर्समधील लहान पर्समध्ये ठेवलेले चार तोळ्यांच्या पाटल्या, लक्ष्मी हार, नेकलेस, नतनी, ब्रेसलेट, मनगटी मनी व रोख रक्कम १५ हजार रुपये असा ८ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून पोबारा केला. हेमलता पाटील या माहेरी रेठरे खुर्दला राहण्यास जाणार असल्याने घरातील सर्व १६ तोळे दागिने पर्समध्ये ठेवले होते. पुढील तपास कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.