कुडित्रे (कोल्हापूर) : करवीरमध्ये ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर पॅनेल बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र आहे. सरपंचपदाचे आरक्षण न काढल्याने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व उमेदवार निश्चित करण्यासाठी नेत्यांची कसरत होत आहे.
सर्वत्र सरपंचपद गुलदस्त्यात तरीही ईर्ष्या मात्र शिगेला पोचली आहे. तालुक्यात ३० ग्रामपंचायती शहरालगतच्या आहेत. यात प्रामुख्याने मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असून, येथे लक्षवेधी लढती होतील; तर म्हारुळ, खाटांगळे, उपवडे अशा लहान वाड्या-वस्त्यांच्या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. मुडशिंगीत महाविकास आघाडीत जागावाटपावरून व इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने तिढा सुटलेला नाही.
हेही वाचा - दारूची तस्करी रोखण्यासाठी दोन गस्ती पथके
भाजपविरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी, आरपीआय, शिवसेना एकत्र असून, तिरंगी लढतीचे चित्र आहे. बालिंग्यात पाच नेते एकत्र येऊन दुसऱ्याच्या वॉर्डमध्ये ढवळाढवळ न करता आपल्याच वॉर्डमध्ये लक्ष देऊन निवडणूक लढविण्यासाठी नियोजन सुरू आहे. खुपिरेत १५ जागांसाठी काँग्रेस विरुद्ध शिवसेना पारंपरिक लढत होईल, असे चित्र आहे. पाडळी खुर्दला महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. येथे आघाडी न झाल्यास शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होईल.
कुडित्रे, सांगवडे, म्हालसवडे, कोपार्डे येथे दुरंगी, तर गिरगाव येथे एका गटात फूट पडल्याने तिरंगी, सडोली खालसात दुरंगी किंवा तिरंगी लढत होईल. तामगावला चौरंगी लढत होईल, असे चित्र आहे. आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याकडे कार्यकर्ते, स्थानिक नेते उमेदवारी व तडजोडीसाठी खेटे घालत आहेत. दक्षिणमध्ये अनेक ठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील व महाडिक गट अशी पारंपरिक लढत होत आहे.
संपादन - स्नेहल कदम
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.