कोल्हापूर : गणपती बाप्पा म्हणजे आबालवृध्दांचे आवडते दैवत, बाप्पाच्या मूर्तीसमोर भक्तीभावाने उभारले, की त्याच्या डोळ्यातील भाव भक्ताच्या अंत:करणापर्यंत पोचावे लागतात, त्यासाठी डोळ्यांत जिवंतपणा आणण्याचे कसब मूर्तीकाराचे असते. शहरातील विविध कुंभार गल्ल्यांतील मूर्तीकारांच्या या कौशल्यामुळेच बाप्पांचे डोळे भक्तांशी बोलू लागले आहेत.
जणू "दर्शनमात्रे मनः कामनापूर्ती' अशीच अनुभुती सर्वांना मिळू लागली आहे. श्री गणेशाचे डोके हे गजमुख असल्याने डोळे माणसांप्रमाणे समोर नसतात. दोन बाजुला असतात. तरीही या दोन डोळ्यांची नजर भक्ताच्या नजरेला भिडण्यासाठी मूर्तीकार आपले कौशल्य पणाला लावतात आणि भक्तही देवाची नजर आपल्यकडेच असली पाहिजे यासाठी आग्रही असतो. ही "डोळ्यांची आखणी..' करणे म्हणजे गणेशमूर्तीचे डोळे तयार करणे आणि कपाळावर शिवगंध लावणे असा प्रचलित शब्द आहे. कोकणात या कामाला "डोळे उघडणे..' असे म्हणतात.
डोळ्यांची आखणी करण्याअगोदरही मूर्तीचे डोळे समोर येण्यासाठी मूर्तीकाम करताना विशिष्ट पध्दतीने डोळे घडवले जातात. कोणतीही मूर्ती पाहताक्षणी चाणाक्ष मूर्तीकाराला त्या मूर्तीचे डोळे समोर असणार की नाहीत, हे समजू शकते. डोळ्यांची आखणी करण्याचे काम सर्वच मूर्तीकार करु शकत नाही. प्रत्त्येक कुंभाराच्या घरात एक आखणी कलाकार असतो. किंवा वेगळा कलाकार बोलावून केले जाते. मूर्तीचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतरच हे काम केले जाते. हे काम करताना त्यासाठी वेगळे रंग वापरले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या ब्रशचा वापर केला जातो.
टी. के. वडणगेकर, केशव पुरेकर ही जुन्या काळातील मूर्तींची डोळे आखणी करणारी नावे तर त्यांच्यानंतर के. आर कुंभार, सर्जेराव निगवेकर, उदय कुंभार हे सध्या मूर्तीचे डोळे करतात .
"तो' पांढरा ठिपका...
सर्वच मूर्तींच्या डोळ्याचा आकार साधारणपणे सारखाच असतो. पण त्याचा रंग मात्र विशेष असतो. मूर्तीच्या डोळ्यातील नजर ही डोळ्यातल्या पांढऱ्या ठिपक्यावर अवलंबून असते. डोळ्याची आखणी पूर्ण झाल्यानंतर शेवटी हा पांढरा ठिपका दिला जातो. डोळ्यातील या ठिपक्याची जागा आणि आकार यावरच डोळ्यातील जिवंतपणा दिसतो. हा ठिपका रंगवणे हेच संपूर्ण डोळा आखणीतील महत्वाचे काम असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.